S M L

उसाच्या दरवाढीसाठी आता शिवसेनाही रस्त्यावर

09 नोव्हेंबरस्वाभिमानी शेतकरी संघटनेपाठोपाठ आता शिवसेनेनंही ऊस दराच्या आंदोलनात उडी घेतली आहे. कोल्हापुरात आज शिवसेनेनं राष्ट्रीय महामार्ग रोखत उसाच्या दराची मागणी केली. पहिली उचल 3 हजार रुपये मिळाल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. आमदार सुजित मिणचेकर आणि जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. दरम्यान, शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. तर पोलिसांनी या सर्वांना ताब्यातही घेतलं. तर या रास्ता रोकोमुळं राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक 2 तास ठप्प झाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2012 12:37 PM IST

उसाच्या दरवाढीसाठी आता शिवसेनाही रस्त्यावर

09 नोव्हेंबर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेपाठोपाठ आता शिवसेनेनंही ऊस दराच्या आंदोलनात उडी घेतली आहे. कोल्हापुरात आज शिवसेनेनं राष्ट्रीय महामार्ग रोखत उसाच्या दराची मागणी केली. पहिली उचल 3 हजार रुपये मिळाल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. आमदार सुजित मिणचेकर आणि जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. दरम्यान, शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. तर पोलिसांनी या सर्वांना ताब्यातही घेतलं. तर या रास्ता रोकोमुळं राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक 2 तास ठप्प झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2012 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close