S M L

सोनिया गांधींनी केली नेत्यांची कानउघडणी

09 नोव्हेंबरकाँग्रेसची सूरजकुंडमध्ये चिंतन बैठक सुरू आहे. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी नेत्यांची कानउघडणी केली. मंत्र्यांनी कार्यकर्त्यांचं गार्‍हाणं ऐकायला पाहिजे. त्यांच्याशी संवाद ठेवा अशा शब्दांत सोनिया गांधींनी वरिष्ठ नेत्यांची कानउघडणी केली. तसंच सरकारनं केलेली चांगली कामं जनतेपर्यंत पोहचवणं आवश्यक असल्याच्या सुचना नेत्यांना केल्यात. पक्ष आणि सरकारमध्ये समन्वयाची गरज असल्याचंही सोनिया गांधींनी वरिष्ठ नेत्यांना सांगितलं. या चिंतन बैठकीदरम्यान, राहुल गांधींवर पक्षकार्याची मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2012 12:58 PM IST

सोनिया गांधींनी केली नेत्यांची कानउघडणी

09 नोव्हेंबर

काँग्रेसची सूरजकुंडमध्ये चिंतन बैठक सुरू आहे. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी नेत्यांची कानउघडणी केली. मंत्र्यांनी कार्यकर्त्यांचं गार्‍हाणं ऐकायला पाहिजे. त्यांच्याशी संवाद ठेवा अशा शब्दांत सोनिया गांधींनी वरिष्ठ नेत्यांची कानउघडणी केली. तसंच सरकारनं केलेली चांगली कामं जनतेपर्यंत पोहचवणं आवश्यक असल्याच्या सुचना नेत्यांना केल्यात. पक्ष आणि सरकारमध्ये समन्वयाची गरज असल्याचंही सोनिया गांधींनी वरिष्ठ नेत्यांना सांगितलं. या चिंतन बैठकीदरम्यान, राहुल गांधींवर पक्षकार्याची मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2012 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close