S M L

शिवसेनेच्या आवाहनानंतर 'स्वाभिमानी'चा रास्तारोको पुढे ढकलला

15 नोव्हेंबरशिवसेनाप्रमुख यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात ऊस दराचे आंदोलन पेटले आहे. त्यामुळे एसटीला मोठा फटका बसला आहे. या आंदोलनामुळे प्रवाशांना हाल सहन करावे लागले आहे. बाळासाहेबांच्या प्रकृतीची बातमी कळताच राज्यभरातून शिवसैनिक मातोश्रीकडे धाव घेतली आहे. त्यामुळे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानीला आंदोलन पुढे ढकलण्यात यावं असं आवाहन केलं होतं. उद्धव यांच्या आवाहनाला रघुनाथ पाटील यांनी प्रतिसाद दिला आहे. शेतकरी संघटनांनी उद्याचा रास्ता रोको लांबणीवर टाकल्याची माहिती रघुनाथ पाटील यांनी दिली आहे. पण आंदोलन संपल्याच नसल्याचंही स्पष्ट केलंय. कार्यकर्त्यांनो संयम बाळगा -राजू शेट्टीदरम्यान, ऊस दरासाठी संघर्ष करणार्‍या कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी तुरूंगातून केलं आहे. आज आमदार गिरीष बापट,कपील पाटील यांनी येरवडा कारागृहात राजू शेट्टींची भेट घेतली. त्यानंतर राजू शेट्टींनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन केलंय. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असून सरकारनं आंदोलन चुकीच्या पध्दतीनं हाताळलं असा आरोपही शेट्टींनी केला. राजू शेट्टी आणि सतीश काकडे यांच्या जामीन अर्जावर उद्या बारामतीच्या अप्पर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. संबंधित बातम्या बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा -सुभाष देसाई (व्हिडिओ) बाळासाहेबांची प्रकृती स्थिर -संजय राऊत बाळासाहेबांवर उपचार सुरू आहेत, शांतता-संयम बाळगा -उद्धव ठाकरे (व्हिडिओ) काळजी बाळासाहेबांची ! (व्हिडिओ) बाबासाहेबांनी घेतली शिवसेनाप्रमुखांची भेट (व्हिडिओ) 'बाळासाहेब हे योद्धा - अमिताभ बच्चन बाळासाहेबांच्या प्रकृतीची चिंता वाटते -लतादीदी(व्हिडिओ) सलमान खान 'मातोश्री'वर(व्हिडिओ) बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी मनसे कार्यकर्त्यांचं बाप्पाला साकडं(व्हिडिओ) 'मातोश्री'बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त (व्हिडिओ) 'मातोश्री'बाहेर शिवसैनिकांची गर्दी (व्हिडिओ) मुंबईत शुकशुकाट ; दुकानं बंद (व्हिडिओ)

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2012 03:37 PM IST

शिवसेनेच्या आवाहनानंतर 'स्वाभिमानी'चा रास्तारोको पुढे ढकलला

15 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात ऊस दराचे आंदोलन पेटले आहे. त्यामुळे एसटीला मोठा फटका बसला आहे. या आंदोलनामुळे प्रवाशांना हाल सहन करावे लागले आहे. बाळासाहेबांच्या प्रकृतीची बातमी कळताच राज्यभरातून शिवसैनिक मातोश्रीकडे धाव घेतली आहे. त्यामुळे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानीला आंदोलन पुढे ढकलण्यात यावं असं आवाहन केलं होतं. उद्धव यांच्या आवाहनाला रघुनाथ पाटील यांनी प्रतिसाद दिला आहे. शेतकरी संघटनांनी उद्याचा रास्ता रोको लांबणीवर टाकल्याची माहिती रघुनाथ पाटील यांनी दिली आहे. पण आंदोलन संपल्याच नसल्याचंही स्पष्ट केलंय.

कार्यकर्त्यांनो संयम बाळगा -राजू शेट्टी

दरम्यान, ऊस दरासाठी संघर्ष करणार्‍या कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी तुरूंगातून केलं आहे. आज आमदार गिरीष बापट,कपील पाटील यांनी येरवडा कारागृहात राजू शेट्टींची भेट घेतली. त्यानंतर राजू शेट्टींनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन केलंय. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असून सरकारनं आंदोलन चुकीच्या पध्दतीनं हाताळलं असा आरोपही शेट्टींनी केला. राजू शेट्टी आणि सतीश काकडे यांच्या जामीन अर्जावर उद्या बारामतीच्या अप्पर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या

बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा -सुभाष देसाई (व्हिडिओ)

बाळासाहेबांची प्रकृती स्थिर -संजय राऊत

बाळासाहेबांवर उपचार सुरू आहेत, शांतता-संयम बाळगा -उद्धव ठाकरे (व्हिडिओ)

काळजी बाळासाहेबांची ! (व्हिडिओ)

बाबासाहेबांनी घेतली शिवसेनाप्रमुखांची भेट (व्हिडिओ)

'बाळासाहेब हे योद्धा - अमिताभ बच्चन

बाळासाहेबांच्या प्रकृतीची चिंता वाटते -लतादीदी(व्हिडिओ)

सलमान खान 'मातोश्री'वर(व्हिडिओ)

बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी मनसे कार्यकर्त्यांचं बाप्पाला साकडं(व्हिडिओ)

'मातोश्री'बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त (व्हिडिओ)

'मातोश्री'बाहेर शिवसैनिकांची गर्दी (व्हिडिओ)

मुंबईत शुकशुकाट ; दुकानं बंद (व्हिडिओ)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2012 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close