S M L

राजू शेट्टींना जामीन मंजूर ;बारामतीत येण्यास बंदी

16 नोव्हेंबरस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सतीश काकडे यांचा जामीन मंजूर झाला आहे. बारामती सेशन कोर्टात 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. पण राजू शेट्टी यांना इंदापूर, बारामती आणि दौड तालुक्यात येण्यास बंदी आहे तर सतीश काकडे यांना इंदापूर आणि दौड तालुक्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज संध्याकाळी राजू शेट्टींची सुटका होणार आहे. ऊस दरवाढीसाठी राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन पुकारण्यात आलं होतं. अशात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजू शेट्टींना आरे-तुरेची भाषा वापरून 'जात' काढली. त्यामुळे संतप्त स्वाभिमानीचे शेतकरी रस्त्यावर उतरले. ऐन दिवाळीच्या आदल्यादिवशी आंदोलनला हिंसक वळण लागलं. सांगली,सातारा, कोल्हापूर जिल्हात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी वाहनाची तोडफोड करत रस्ते बंद पाडले. काही ठिकाणी स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्या धुमश्चक्री उडाली. या आंदोलनात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2012 09:30 AM IST

राजू शेट्टींना जामीन मंजूर ;बारामतीत येण्यास बंदी

16 नोव्हेंबर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सतीश काकडे यांचा जामीन मंजूर झाला आहे. बारामती सेशन कोर्टात 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. पण राजू शेट्टी यांना इंदापूर, बारामती आणि दौड तालुक्यात येण्यास बंदी आहे तर सतीश काकडे यांना इंदापूर आणि दौड तालुक्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज संध्याकाळी राजू शेट्टींची सुटका होणार आहे. ऊस दरवाढीसाठी राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन पुकारण्यात आलं होतं. अशात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजू शेट्टींना आरे-तुरेची भाषा वापरून 'जात' काढली. त्यामुळे संतप्त स्वाभिमानीचे शेतकरी रस्त्यावर उतरले. ऐन दिवाळीच्या आदल्यादिवशी आंदोलनला हिंसक वळण लागलं. सांगली,सातारा, कोल्हापूर जिल्हात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी वाहनाची तोडफोड करत रस्ते बंद पाडले. काही ठिकाणी स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्या धुमश्चक्री उडाली. या आंदोलनात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2012 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close