S M L

सीएसटी हिंसाचार प्रकरणी आरोपपत्र दाखल

09 नोव्हेंबरआझाद मैदान हिंसाचार प्रकरणात क्राईम ब्रांचने कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. या प्रकरणात एकूण 63 लोकांना अटक झाली होती. तर पाच जणांना पुराव्याअभावी सोडण्यात आलं होतं. आणि 45 लोकांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तसेच 12 जण अजूनही तुरुंगात आहेत. 11 ऑगस्टला रझा अकादमी या संघटनेनं आसाममध्ये झालेल्या दंगलीचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला होता. पण या मोर्चाला हिंसकवळण लागले आणि संतप्त जमावाने सीएसटी स्टेशन परिसरात एकच हैदोस घातला होता. जमावने बेस्ट बसेससह खासगी गाड्यांना लक्ष करत तोडफोड केली होती. हा जमाव एवढ्यावरच थांबला नाही त्यांनी मीडियाच्या ओबी व्हन पेटवून दिल्या होत्या. संतप्त जमावाने पोलिसांवरही हल्ला चढवला. या हुन धक्कादायक म्हणजे या जमावाने अमर जवान स्मारकाची नासधूस केली होती. या घटनेत 92 लोक जखमी झाले होते. त्यात 76 पोलिसांचा समावेश होता. या हिंसाचारात एकूण 2 कोटी 74 लाख 33 हजाराचे नुकसान झालंय. यापैकी 2 कोटी 37 लाखांचे खाजगी नुकसान झाले तर 36 लाखाचे सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत मुंबई पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज केला आहे. मदीना तुल इल्म या आयोजकाकडून नुकसान भरपाई वसुल करण्याची मागणी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2012 03:00 PM IST

सीएसटी हिंसाचार प्रकरणी आरोपपत्र दाखल

09 नोव्हेंबर

आझाद मैदान हिंसाचार प्रकरणात क्राईम ब्रांचने कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. या प्रकरणात एकूण 63 लोकांना अटक झाली होती. तर पाच जणांना पुराव्याअभावी सोडण्यात आलं होतं. आणि 45 लोकांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तसेच 12 जण अजूनही तुरुंगात आहेत.

11 ऑगस्टला रझा अकादमी या संघटनेनं आसाममध्ये झालेल्या दंगलीचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला होता. पण या मोर्चाला हिंसकवळण लागले आणि संतप्त जमावाने सीएसटी स्टेशन परिसरात एकच हैदोस घातला होता. जमावने बेस्ट बसेससह खासगी गाड्यांना लक्ष करत तोडफोड केली होती. हा जमाव एवढ्यावरच थांबला नाही त्यांनी मीडियाच्या ओबी व्हन पेटवून दिल्या होत्या. संतप्त जमावाने पोलिसांवरही हल्ला चढवला. या हुन धक्कादायक म्हणजे या जमावाने अमर जवान स्मारकाची नासधूस केली होती. या घटनेत 92 लोक जखमी झाले होते. त्यात 76 पोलिसांचा समावेश होता. या हिंसाचारात एकूण 2 कोटी 74 लाख 33 हजाराचे नुकसान झालंय. यापैकी 2 कोटी 37 लाखांचे खाजगी नुकसान झाले तर 36 लाखाचे सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत मुंबई पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज केला आहे. मदीना तुल इल्म या आयोजकाकडून नुकसान भरपाई वसुल करण्याची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2012 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close