S M L

साहेबांना निरोप देण्यास लोटला जनसागर

18 नोव्हेंबर'बाळासाहेब ठाकरे अमर रहे'चा गजर करत लाखो शिवसैनिक आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी महाअंत्ययात्रेत लाखोंच्या संख्येनं सामील झाले आहेत. आज सकाळी 9 वाजता बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव मातोश्रीतून बाहेर आणण्यात आलं. बाळासाहेबांचं पार्थिव जेव्हा बाहेर आलं तेव्हा ठाकरे कुटुंबीयांसह उपस्थित शिवसैनिकांना अश्रू रोखता आले नाही. गेल्या चार दिवसांपासून मातोश्रीबाहेर ताटकाळात असलेल्या शिवसैनिकांनी यावेळी अश्रंूना वाट मोकळी करून दिली. बाळासाहेबांना खांदा देत असताना उद्धव यांना अश्रू आवरणं कठीण झालं होतं. त्यावेळी आदित्य त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होते. साहेबांच्या पार्थिवाला राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांचा अश्रूंचा बांध फुटला. मानवंदना दिल्यानंतर पार्थिव रथावर ठेवण्यात आलं. मातोश्रीवरून रथ 'शिवतीर्था'कडे निघाला. लाखो शिवसैनिक अंत्ययात्रेत सहभागी झाले. 'बाळासाहेब ठाकरे अमर रहे' गजर करत रथ एक एक पाऊल पुढे सरकत होतं. वांद्रे द्रुतगती महामार्गावर या अंत्ययात्रेचं विशाल जनसागराने रुप घेतलं. वांद्रे ते माहिम हे चार किलोमीटरचं अंतर गाठायला चार तास लागले. हुंदके, साश्रूनयनांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या अखेरच्या प्रवासात शिवसैनिक सहभागी झालेत. बाळासाहेबांचं पार्थिव सेनाभवनमध्ये काही वेळासाठी ठेवलं जाईल. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचं अंत्यदर्शन सगळ्यांना घेता येणार आहे. संध्याकाळी पाचनंतर बाळासाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनंतात विलीनबाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी दिला पार्थिवाला मंत्राग्नीअमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे, बाळासाहेब परत या शिवसैनिकांचा गजरशासकीय इतमामात बाळासाहेबांवर अंत्यसंस्कारला सुरुवात, पोलिसांची 21 बंदुकांची सलामीबाळासाहेबांचं पार्थिव शिवतीर्थावर, थोड्याच वेळात होणार शासकीय उतमामात अंत्यसंस्कार अरूण जेटली, खासदार विजय दर्डा, रामविलास पासवान, भैय्यू महाराज उपस्थितशिवाजी पार्कवर मान्यवरांची रीघअभिनेता अमिताभ बच्चन, नाना पाटेकर उपस्थितशिवाजी पार्कवर भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उपस्थितबाळासाहेबांचं पार्थिव सेनाभवनातून शिवतीर्थाकडे निघाले बाळासाहेबांचं पार्थिव सेनाभवनात, थोडावेळ सेनाभवनात ठेवणारशिवसेना भवनाजवळ पोहचली अंत्ययात्रामहाअंत्ययात्रा माटुंगा सिटीलाईटपर्यंत पोहचली राज ठाकरे माहिम कॉजवेपर्यंत चालत आले त्यानंतर त्यांनी मार्ग बदलून ते घरी गेलेत आता ते थेट शिवाजी पार्कात अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचणार आहेत रथावर उध्दव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य, तेजस आणि शर्मिला ठाकरे तर राज ठाकरे रथाच्या मागे काही कुटुंबीयांसमवेत चालत आहेतमाहिमजवळ स्थानिक रहिवासी घरांच्या छपरावर,गॅलरीत येऊन घेत आहे बाळासाहेबांचं दर्शन अत्यंयात्रेत 'बाळासाहेब अमर रहे'चा घोषअत्यंयात्रा माहिम कॉजवेला पोहचली माहिमजवळ स्थानिक रहिवासी घरांच्या छपरावर,गॅलरीत येऊन घेत आहे बाळासाहेबांचं दर्शन अत्यंयात्रेत 'बाळासाहेब अमर रहे'चा घोषअत्यंयात्रा माहिम कॉजवेला पोहचलीशिवाजी पार्कबाहेर 3 किलोमीटरपर्यंत रांगारथावर शिवसैनिकांकडून पुष्पवृष्टीमहाअंत्ययात्रेत लाखो शिवसैनिकांचा सहभागमहाअंत्ययात्रेला लोटला जनसागरमहाअंत्ययात्रा वांद्रे हायवेवर, लाखो शिवसैनिकांचा सहभागसकाळी 9:10 : महाअंत्ययात्रेला सुरुवातबाळासाहेबांचे पार्थिव बाहेर आणलं. साहेबांच्या डोळ्यावर त्यांचा गॉगल होतासकाळी 9 वाजता : बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीबाहेर आणलंसकाळी 8:20 वाजता : राज ठाकरे मातोश्रीतून बाहेर आले, बाहेर व्यवस्थेचा आढावा घेतलासकाळी 7:50 वाजता : राज ठाकरे मातोश्रीवर पोहचलेसकाळी 7:40 वाजता : मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी तुफान गर्दीसकाळी 7:20 वाजता : फुलाने सजविलेला रथ मातोश्रीवर दाखलसकाळी 7 वाजता : मातोश्री,शिवसेना भवन आणि शिवाजी पार्कवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2012 04:16 AM IST

साहेबांना निरोप देण्यास लोटला जनसागर

18 नोव्हेंबर

'बाळासाहेब ठाकरे अमर रहे'चा गजर करत लाखो शिवसैनिक आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी महाअंत्ययात्रेत लाखोंच्या संख्येनं सामील झाले आहेत. आज सकाळी 9 वाजता बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव मातोश्रीतून बाहेर आणण्यात आलं. बाळासाहेबांचं पार्थिव जेव्हा बाहेर आलं तेव्हा ठाकरे कुटुंबीयांसह उपस्थित शिवसैनिकांना अश्रू रोखता आले नाही. गेल्या चार दिवसांपासून मातोश्रीबाहेर ताटकाळात असलेल्या शिवसैनिकांनी यावेळी अश्रंूना वाट मोकळी करून दिली. बाळासाहेबांना खांदा देत असताना उद्धव यांना अश्रू आवरणं कठीण झालं होतं. त्यावेळी आदित्य त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होते. साहेबांच्या पार्थिवाला राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांचा अश्रूंचा बांध फुटला. मानवंदना दिल्यानंतर पार्थिव रथावर ठेवण्यात आलं. मातोश्रीवरून रथ 'शिवतीर्था'कडे निघाला. लाखो शिवसैनिक अंत्ययात्रेत सहभागी झाले. 'बाळासाहेब ठाकरे अमर रहे' गजर करत रथ एक एक पाऊल पुढे सरकत होतं. वांद्रे द्रुतगती महामार्गावर या अंत्ययात्रेचं विशाल जनसागराने रुप घेतलं. वांद्रे ते माहिम हे चार किलोमीटरचं अंतर गाठायला चार तास लागले. हुंदके, साश्रूनयनांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या अखेरच्या प्रवासात शिवसैनिक सहभागी झालेत. बाळासाहेबांचं पार्थिव सेनाभवनमध्ये काही वेळासाठी ठेवलं जाईल. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचं अंत्यदर्शन सगळ्यांना घेता येणार आहे. संध्याकाळी पाचनंतर बाळासाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनंतात विलीनबाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी दिला पार्थिवाला मंत्राग्नीअमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे, बाळासाहेब परत या शिवसैनिकांचा गजरशासकीय इतमामात बाळासाहेबांवर अंत्यसंस्कारला सुरुवात, पोलिसांची 21 बंदुकांची सलामीबाळासाहेबांचं पार्थिव शिवतीर्थावर, थोड्याच वेळात होणार शासकीय उतमामात अंत्यसंस्कार अरूण जेटली, खासदार विजय दर्डा, रामविलास पासवान, भैय्यू महाराज उपस्थितशिवाजी पार्कवर मान्यवरांची रीघअभिनेता अमिताभ बच्चन, नाना पाटेकर उपस्थितशिवाजी पार्कवर भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उपस्थितबाळासाहेबांचं पार्थिव सेनाभवनातून शिवतीर्थाकडे निघाले बाळासाहेबांचं पार्थिव सेनाभवनात, थोडावेळ सेनाभवनात ठेवणारशिवसेना भवनाजवळ पोहचली अंत्ययात्रामहाअंत्ययात्रा माटुंगा सिटीलाईटपर्यंत पोहचली राज ठाकरे माहिम कॉजवेपर्यंत चालत आले त्यानंतर त्यांनी मार्ग बदलून ते घरी गेलेत आता ते थेट शिवाजी पार्कात अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचणार आहेत रथावर उध्दव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य, तेजस आणि शर्मिला ठाकरे तर राज ठाकरे रथाच्या मागे काही कुटुंबीयांसमवेत चालत आहेतमाहिमजवळ स्थानिक रहिवासी घरांच्या छपरावर,गॅलरीत येऊन घेत आहे बाळासाहेबांचं दर्शन अत्यंयात्रेत 'बाळासाहेब अमर रहे'चा घोषअत्यंयात्रा माहिम कॉजवेला पोहचली माहिमजवळ स्थानिक रहिवासी घरांच्या छपरावर,गॅलरीत येऊन घेत आहे बाळासाहेबांचं दर्शन अत्यंयात्रेत 'बाळासाहेब अमर रहे'चा घोषअत्यंयात्रा माहिम कॉजवेला पोहचलीशिवाजी पार्कबाहेर 3 किलोमीटरपर्यंत रांगारथावर शिवसैनिकांकडून पुष्पवृष्टीमहाअंत्ययात्रेत लाखो शिवसैनिकांचा सहभागमहाअंत्ययात्रेला लोटला जनसागरमहाअंत्ययात्रा वांद्रे हायवेवर, लाखो शिवसैनिकांचा सहभागसकाळी 9:10 : महाअंत्ययात्रेला सुरुवातबाळासाहेबांचे पार्थिव बाहेर आणलं. साहेबांच्या डोळ्यावर त्यांचा गॉगल होतासकाळी 9 वाजता : बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीबाहेर आणलंसकाळी 8:20 वाजता : राज ठाकरे मातोश्रीतून बाहेर आले, बाहेर व्यवस्थेचा आढावा घेतलासकाळी 7:50 वाजता : राज ठाकरे मातोश्रीवर पोहचलेसकाळी 7:40 वाजता : मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी तुफान गर्दीसकाळी 7:20 वाजता : फुलाने सजविलेला रथ मातोश्रीवर दाखलसकाळी 7 वाजता : मातोश्री,शिवसेना भवन आणि शिवाजी पार्कवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2012 04:16 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close