S M L

सहकारमंत्र्यांपाठोपाठ दूध संचालकांचा ऊस जाळला

16 नोव्हेंबरपश्चिम महाराष्ट्र ऊस दराचे आंदोलन पेटले असताना बुधवारी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शेतातील ऊस जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. काही अज्ञात लोकांनी हा ऊस जाळलाय. कळाशी गावात हर्षवर्धन पाटील यांच्या शेतात जवळपास दोन एकर जागेवरील उस जाळून टाकण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. तर आज शुक्रवारी इंदापूर सहकारी दूध संघाचे संचालक मंगेश पाटील यांच्या शेतातील पाच एकरातील ऊस रात्री अज्ञातांनी जाळला. त्याचबरोबर कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक तुकाराम जाधव यांचे भाऊ वामन जाधव यांचाही पाच एकरातील ऊस जाळला. कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक वामन सरडे यांचाही ऊस पेटवला आहे. पोलीस पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2012 09:44 AM IST

सहकारमंत्र्यांपाठोपाठ दूध संचालकांचा ऊस जाळला

16 नोव्हेंबर

पश्चिम महाराष्ट्र ऊस दराचे आंदोलन पेटले असताना बुधवारी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शेतातील ऊस जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. काही अज्ञात लोकांनी हा ऊस जाळलाय. कळाशी गावात हर्षवर्धन पाटील यांच्या शेतात जवळपास दोन एकर जागेवरील उस जाळून टाकण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. तर आज शुक्रवारी इंदापूर सहकारी दूध संघाचे संचालक मंगेश पाटील यांच्या शेतातील पाच एकरातील ऊस रात्री अज्ञातांनी जाळला. त्याचबरोबर कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक तुकाराम जाधव यांचे भाऊ वामन जाधव यांचाही पाच एकरातील ऊस जाळला. कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक वामन सरडे यांचाही ऊस पेटवला आहे. पोलीस पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2012 09:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close