S M L

मराठवाड्याला हक्काच्या पाण्यासाठी शिवसेनेचा महामोर्चा

09 नोव्हेंबरमराठवाड्याला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे या मागणीसाठी शिवसेनेनी आज औरंगाबादमध्ये महामोर्चा काढला. गेल्या महिनाभरापासून मराठवाड्याला उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातून पाणी देण्याची मागणी होत आहे. भंडारदरा धरणातून दिलेल्या अडीच टीएमसी पाण्यापैकी फक्त 1 टीएमसी पाणी मराठवाडयाच्या वाटाल्या आले. आता मराठवाडयाला किमान 19 टीएमसीची मागणी शिवसेनेनी केलीय. मराठवाडयातील शिवसैनिकांनी एकत्र येऊन हा महामोर्चा काढला. क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदिप जैयस्वाल, जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2012 03:24 PM IST

मराठवाड्याला हक्काच्या पाण्यासाठी शिवसेनेचा महामोर्चा

09 नोव्हेंबर

मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे या मागणीसाठी शिवसेनेनी आज औरंगाबादमध्ये महामोर्चा काढला. गेल्या महिनाभरापासून मराठवाड्याला उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातून पाणी देण्याची मागणी होत आहे. भंडारदरा धरणातून दिलेल्या अडीच टीएमसी पाण्यापैकी फक्त 1 टीएमसी पाणी मराठवाडयाच्या वाटाल्या आले. आता मराठवाडयाला किमान 19 टीएमसीची मागणी शिवसेनेनी केलीय. मराठवाडयातील शिवसैनिकांनी एकत्र येऊन हा महामोर्चा काढला. क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदिप जैयस्वाल, जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2012 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close