S M L

बाळासाहेब अनंतात विलीन

18 नोव्हेंबरज्या 'शिवतीर्था'वर शिवसेनेचा जन्म झाला त्याच शिवतीर्थावर 46 वर्षांनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा 'जय महाराष्ट्र' घेतलाय. संध्याकाळी सहाच्या सुमाराला बाळासाहेबांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलं. साहेबांना 21 बंदुकांची सलामी देण्यात आली. बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी पार्थिवाला मंत्राग्नी दिला. यावेळी शिवतीर्थावर लाखो शिवसैनिकांनी 'बाळासाहेब ठाकरे अमर रहे, परत या परत बाळासाहेब परत या'चा गजर केला. आणि आपल्या या लाडक्या नेत्याला साश्रूनयनांनी निरोप दिला. मातोश्रीवरून निघालेली बाळासाहेबांची महाअंत्ययात्रा अलोट गर्दीसह सात तासांनतर शिवाजी पार्कवर दाखल झाली. महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांच्या अंत्ययात्रेला गर्दी नसेल इतकी गर्दी बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला होती. संपूर्ण शिवाजी पार्कवर नजर फिरवली तर बाळासाहेबांच्या शिवसैनिकांशिवाय दुसरे कोणीच नव्हते. महाअंत्ययात्रेत ज्या रथावर बाळासाहेबांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. त्या रथाला अनेक शिवसैनिकांनी हात लावून दर्शन घेतलं. आसूसलेल्या डोळ्यात बाळासाहेबांचं रुप साठवून घेत 'साहेब, पुन्हा जन्म घ्या' अशी आर्त हाक दिली. बाळासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयदेव ठाकरेंसह संपुर्ण कुटुंबीय हजर होतं. तसेच बाळासाहेबांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज,राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे खासदार विजय दर्डा, अभिनेता अमिताभ बच्चन, उद्योजक अनिल अंबानी, नाना पाटेकर आणि शिवसेनेचे सर्व आमदार,खासदार पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.दिवसभरातला घटनाक्रम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनंतात विलीनबाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी दिला पार्थिवाला मंत्राग्नीअमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे, बाळासाहेब परत या शिवसैनिकांचा गजरशासकीय इतमामात बाळासाहेबांवर अंत्यसंस्कारला सुरुवात, पोलिसांची 21 बंदुकांची सलामीबाळासाहेबांचं पार्थिव शिवतीर्थावर, थोड्याच वेळात होणार शासकीय उतमामात अंत्यसंस्कार अरूण जेटली, खासदार विजय दर्डा, रामविलास पासवान, भैय्यू महाराज उपस्थितशिवाजी पार्कवर मान्यवरांची रीघअभिनेता अमिताभ बच्चन, नाना पाटेकर उपस्थितशिवाजी पार्कवर भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उपस्थितबाळासाहेबांचं पार्थिव सेनाभवनातून शिवतीर्थाकडे निघाले बाळासाहेबांचं पार्थिव सेनाभवनात, थोडावेळ सेनाभवनात ठेवणारशिवसेना भवनाजवळ पोहचली अंत्ययात्रामहाअंत्ययात्रा माटुंगा सिटीलाईटपर्यंत पोहचली राज ठाकरे माहिम कॉजवेपर्यंत चालत आले त्यानंतर त्यांनी मार्ग बदलून ते घरी गेलेत आता ते थेट शिवाजी पार्कात अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचणार आहेत रथावर उध्दव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य, तेजस आणि शर्मिला ठाकरे तर राज ठाकरे रथाच्या मागे काही कुटुंबीयांसमवेत चालत आहेतमाहिमजवळ स्थानिक रहिवासी घरांच्या छपरावर,गॅलरीत येऊन घेत आहे बाळासाहेबांचं दर्शन अत्यंयात्रेत 'बाळासाहेब अमर रहे'चा घोषअत्यंयात्रा माहिम कॉजवेला पोहचली माहिमजवळ स्थानिक रहिवासी घरांच्या छपरावर,गॅलरीत येऊन घेत आहे बाळासाहेबांचं दर्शन अत्यंयात्रेत 'बाळासाहेब अमर रहे'चा घोषअत्यंयात्रा माहिम कॉजवेला पोहचलीशिवाजी पार्कबाहेर 3 किलोमीटरपर्यंत रांगारथावर शिवसैनिकांकडून पुष्पवृष्टीमहाअंत्ययात्रेत लाखो शिवसैनिकांचा सहभागमहाअंत्ययात्रेला लोटला जनसागरमहाअंत्ययात्रा वांद्रे हायवेवर, लाखो शिवसैनिकांचा सहभागसकाळी 9:10 : महाअंत्ययात्रेला सुरुवातबाळासाहेबांचे पार्थिव बाहेर आणलं. साहेबांच्या डोळ्यावर त्यांचा गॉगल होतासकाळी 9 वाजता : बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीबाहेर आणलंसकाळी 8:20 वाजता : राज ठाकरे मातोश्रीतून बाहेर आले, बाहेर व्यवस्थेचा आढावा घेतलासकाळी 7:50 वाजता : राज ठाकरे मातोश्रीवर पोहचलेसकाळी 7:40 वाजता : मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी तुफान गर्दीसकाळी 7:20 वाजता : फुलाने सजविलेला रथ मातोश्रीवर दाखलसकाळी 7 वाजता : मातोश्री,शिवसेना भवन आणि शिवाजी पार्कवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2012 12:47 PM IST

बाळासाहेब अनंतात विलीन

18 नोव्हेंबर

ज्या 'शिवतीर्था'वर शिवसेनेचा जन्म झाला त्याच शिवतीर्थावर 46 वर्षांनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा 'जय महाराष्ट्र' घेतलाय. संध्याकाळी सहाच्या सुमाराला बाळासाहेबांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलं. साहेबांना 21 बंदुकांची सलामी देण्यात आली. बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी पार्थिवाला मंत्राग्नी दिला. यावेळी शिवतीर्थावर लाखो शिवसैनिकांनी 'बाळासाहेब ठाकरे अमर रहे, परत या परत बाळासाहेब परत या'चा गजर केला. आणि आपल्या या लाडक्या नेत्याला साश्रूनयनांनी निरोप दिला. मातोश्रीवरून निघालेली बाळासाहेबांची महाअंत्ययात्रा अलोट गर्दीसह सात तासांनतर शिवाजी पार्कवर दाखल झाली. महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांच्या अंत्ययात्रेला गर्दी नसेल इतकी गर्दी बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला होती. संपूर्ण शिवाजी पार्कवर नजर फिरवली तर बाळासाहेबांच्या शिवसैनिकांशिवाय दुसरे कोणीच नव्हते. महाअंत्ययात्रेत ज्या रथावर बाळासाहेबांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. त्या रथाला अनेक शिवसैनिकांनी हात लावून दर्शन घेतलं. आसूसलेल्या डोळ्यात बाळासाहेबांचं रुप साठवून घेत 'साहेब, पुन्हा जन्म घ्या' अशी आर्त हाक दिली. बाळासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयदेव ठाकरेंसह संपुर्ण कुटुंबीय हजर होतं. तसेच बाळासाहेबांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज,राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे खासदार विजय दर्डा, अभिनेता अमिताभ बच्चन, उद्योजक अनिल अंबानी, नाना पाटेकर आणि शिवसेनेचे सर्व आमदार,खासदार पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

दिवसभरातला घटनाक्रम

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनंतात विलीनबाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी दिला पार्थिवाला मंत्राग्नीअमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे, बाळासाहेब परत या शिवसैनिकांचा गजरशासकीय इतमामात बाळासाहेबांवर अंत्यसंस्कारला सुरुवात, पोलिसांची 21 बंदुकांची सलामीबाळासाहेबांचं पार्थिव शिवतीर्थावर, थोड्याच वेळात होणार शासकीय उतमामात अंत्यसंस्कार अरूण जेटली, खासदार विजय दर्डा, रामविलास पासवान, भैय्यू महाराज उपस्थितशिवाजी पार्कवर मान्यवरांची रीघअभिनेता अमिताभ बच्चन, नाना पाटेकर उपस्थितशिवाजी पार्कवर भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उपस्थितबाळासाहेबांचं पार्थिव सेनाभवनातून शिवतीर्थाकडे निघाले बाळासाहेबांचं पार्थिव सेनाभवनात, थोडावेळ सेनाभवनात ठेवणारशिवसेना भवनाजवळ पोहचली अंत्ययात्रामहाअंत्ययात्रा माटुंगा सिटीलाईटपर्यंत पोहचली राज ठाकरे माहिम कॉजवेपर्यंत चालत आले त्यानंतर त्यांनी मार्ग बदलून ते घरी गेलेत आता ते थेट शिवाजी पार्कात अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचणार आहेत रथावर उध्दव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य, तेजस आणि शर्मिला ठाकरे तर राज ठाकरे रथाच्या मागे काही कुटुंबीयांसमवेत चालत आहेतमाहिमजवळ स्थानिक रहिवासी घरांच्या छपरावर,गॅलरीत येऊन घेत आहे बाळासाहेबांचं दर्शन अत्यंयात्रेत 'बाळासाहेब अमर रहे'चा घोषअत्यंयात्रा माहिम कॉजवेला पोहचली माहिमजवळ स्थानिक रहिवासी घरांच्या छपरावर,गॅलरीत येऊन घेत आहे बाळासाहेबांचं दर्शन अत्यंयात्रेत 'बाळासाहेब अमर रहे'चा घोषअत्यंयात्रा माहिम कॉजवेला पोहचलीशिवाजी पार्कबाहेर 3 किलोमीटरपर्यंत रांगारथावर शिवसैनिकांकडून पुष्पवृष्टीमहाअंत्ययात्रेत लाखो शिवसैनिकांचा सहभागमहाअंत्ययात्रेला लोटला जनसागरमहाअंत्ययात्रा वांद्रे हायवेवर, लाखो शिवसैनिकांचा सहभागसकाळी 9:10 : महाअंत्ययात्रेला सुरुवातबाळासाहेबांचे पार्थिव बाहेर आणलं. साहेबांच्या डोळ्यावर त्यांचा गॉगल होतासकाळी 9 वाजता : बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीबाहेर आणलंसकाळी 8:20 वाजता : राज ठाकरे मातोश्रीतून बाहेर आले, बाहेर व्यवस्थेचा आढावा घेतलासकाळी 7:50 वाजता : राज ठाकरे मातोश्रीवर पोहचलेसकाळी 7:40 वाजता : मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी तुफान गर्दीसकाळी 7:20 वाजता : फुलाने सजविलेला रथ मातोश्रीवर दाखलसकाळी 7 वाजता : मातोश्री,शिवसेना भवन आणि शिवाजी पार्कवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2012 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close