S M L

गडकरींवर आरोपांमागे मोदींचा हात -मा.गो.वैद्य

12 नोव्हेंबरभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर होणार्‍या आरोपांमागे नरेंद्र मोदी यांचा हात असल्याचा गंभीर आरोप संघाचे माजी सरकार्यवाहक मा.गो.वैद्य यांनी केला. याच कटाचा एक भाग म्हणून राम जेठमलानी हे गडकरींच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. गडकरी आणि अडवाणी यांनी जाहीरपणे आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलंय. पण मोदींनी आतापर्यंत आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं जाहीर केलेलं नाही तसंच मोदींना पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा असल्याचं म्हटलंय. वैद्य यांनी आपल्या ब्लॉगमध्ये गडकरींविरोधातील मोहीमेची सूत्र गुजरातमधून हलवली जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान,ही संघाची भूमिका नसून मा.गो.वैद्य यांचं वैयक्तिक मत असल्याचं संघाचे प्रचार कार्यवाहक मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्यापाठोपाठ स्पष्टीकरण देण्यासाठी खुद्द नितीन गडकरींनी पुढाकार घेतला आहे. नितीन गडकरींनी एक निवेदन प्रसिद्ध करत वैद्य यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचा म्हटलंय. तसंच भाजपच्या सगळे नेते एकत्र येऊन काम करत आहे भाजपचा नरेंद्र मोदींना पूर्ण पाठिंबा असून गुजरातमध्ये मोदींचाच विजय होईल असा दावाही गडकरींनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2012 11:34 AM IST

गडकरींवर आरोपांमागे मोदींचा हात -मा.गो.वैद्य

12 नोव्हेंबर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर होणार्‍या आरोपांमागे नरेंद्र मोदी यांचा हात असल्याचा गंभीर आरोप संघाचे माजी सरकार्यवाहक मा.गो.वैद्य यांनी केला. याच कटाचा एक भाग म्हणून राम जेठमलानी हे गडकरींच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. गडकरी आणि अडवाणी यांनी जाहीरपणे आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलंय. पण मोदींनी आतापर्यंत आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं जाहीर केलेलं नाही तसंच मोदींना पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा असल्याचं म्हटलंय. वैद्य यांनी आपल्या ब्लॉगमध्ये गडकरींविरोधातील मोहीमेची सूत्र गुजरातमधून हलवली जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

दरम्यान,ही संघाची भूमिका नसून मा.गो.वैद्य यांचं वैयक्तिक मत असल्याचं संघाचे प्रचार कार्यवाहक मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्यापाठोपाठ स्पष्टीकरण देण्यासाठी खुद्द नितीन गडकरींनी पुढाकार घेतला आहे. नितीन गडकरींनी एक निवेदन प्रसिद्ध करत वैद्य यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचा म्हटलंय. तसंच भाजपच्या सगळे नेते एकत्र येऊन काम करत आहे भाजपचा नरेंद्र मोदींना पूर्ण पाठिंबा असून गुजरातमध्ये मोदींचाच विजय होईल असा दावाही गडकरींनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2012 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close