S M L

किनारपट्टीच्या सुरक्षेकडं सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष

3 डिसेंबर, कोकणदिनेश केळुस्करमुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षा खरं तर अतिमहत्वाची झालीय. पण कोकणचा समुद्र अजूनही असुरक्षितच आहे. इथं स्पीडबोटस् ऐवजी मच्छिमारांच्या नौकांचाच गस्तीसाठी वापर केला जातोय. कोस्टल पोलीस-ठाणीही अजून उभी राहिलेली नाहीत. त्यामुळं अतिरेकी केव्हाही कोकणच्या समुद्रमार्गानं येऊ शकतात, असं इथल्या मच्छिमारांचं म्हणणं आहे.कस्टम विभागाच्या या गस्तीनौका मच्छीमारांच्याच मासेमारी नौका. ताशी फक्त सहा नॉटिकल मैल वेगानंच धावू शकतात. शिवाय संशयास्पद जागांबाबतही पोलीस आणि कस्टम विभाग माहित असूनही दुर्लक्ष करतोय, असं इथल्या मच्छिमारांचं म्हणणं आहे."जिथे स्मगलिंगच्या जागा आहेत आड्याची सावनेर म्हणतात तिथे चांदी उतरलेली होती कस्टमला माहीती आहे हे माहीत असून सुध्दा तिथे संरक्षण दृष्टीने काही हालचाल केलेली नाही" असं आनंद पाटील या मच्छिमारानं सांगितलं.असं असूनही कोकणसाठी मिळणा-या हायस्पीड बोटी पुढ़च्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत मिळतील असं पोलीस महानिरीक्षकांचं म्हणणं आहे. "एकूण 24 बोटी महाराष्ट्राला मिळनार आहेत. त्याची स्पिड जास्त आहे. त्या पुढच्या वर्षी ऑक्टोबर पर्यंत येतील." असं कोकणचे विभागीय पोलीस निरीक्षक के.के. पाठक यांनी सांगितलं.सागरी पोलीस ठाण्याचंही काम अजून झालेलं नाही. रत्नागिरीतल्या जयगड सागरी पोलीस ठाण्याची इमारत बांधण्यासाठी अजूनही सुरुवात झालेली नाही. "समजा बाजूला आमच्या बोट आली तर आम्ही काहीच करू शकत नाही .आता समजा वायरलेस असला तर आम्ही कुणाला तरी बोलू शकता" असं फर्मान संसारे या मच्छिमाराने सांगितलं.सागरी सुरक्षेसाठी अतिमहत्वाचे असे 47 लँडिंग पॉईंट सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळले आहेत. तर रत्नागिरीत असे सुमारे पंधरा पॉईंट आहेत. या ठिकाणी अतिरेकी सहज उतरू शकतात. पण तरीही सरकारी यंत्रणा कोकणच्या किना-याकडे होणारं दुर्लक्ष थांबलेलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2008 05:49 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2008 05:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close