S M L

राज्य सहकारी बँकेला 176 कोटींचा निव्वळ नफा

09 नोव्हेंबरदीड वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं राज्यातल्या सहकारी बँकांची शिखर बँक असलेल्या राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं होतं. त्यात एकमेव मंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार संचालक होते. 7 मे 2011 ला राज्य सरकारनं या बँकेवर प्रशासकांची नेमणूक केली. तेव्हापासून बँकेचा कारभार प्रशासकांच्या हातात गेला. प्रशासकांनी थकित कर्जाची वसुलीला गती आणली. त्यामुळे गेल्या 31 मार्चला बँकेचा निव्वळ नफा 176 कोटी रुपयांचा झाला आहे. त्यामुळे गेल्या 19 एप्रिलला बँकेला रिझर्व्ह बँकेचा परवाना मिळाला. तर गेल्या 30 सप्टेंबरला बँकेनं संचित तोटा पूर्णपणे भरून काढला. तसंच बँकेचा सीआरएआर (CRAR) 8 पूर्णांक 54 टक्के इतका झाला तर एसआलआर (SLR) 40 टक्के झाला. सध्या बँकेची लिक्विडिटी 17 टक्क्यांनी वाढली. त्यामुळे फेब्रुवारी 2013 पूर्वी बँकेवर 21 संचालकांचं मंडळ येऊ शकतं अशी स्थिती आहे. त्यासाठीच येत्या हिवाळी अधिवेशनात सहकार कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. अशा प्रकारे पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात राज्य बँकेला परवाना मिळाला तसंच आता नवं संचालक मंडळही अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झालीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2012 05:36 PM IST

राज्य सहकारी बँकेला 176 कोटींचा निव्वळ नफा

09 नोव्हेंबर

दीड वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं राज्यातल्या सहकारी बँकांची शिखर बँक असलेल्या राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं होतं. त्यात एकमेव मंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार संचालक होते. 7 मे 2011 ला राज्य सरकारनं या बँकेवर प्रशासकांची नेमणूक केली. तेव्हापासून बँकेचा कारभार प्रशासकांच्या हातात गेला. प्रशासकांनी थकित कर्जाची वसुलीला गती आणली. त्यामुळे गेल्या 31 मार्चला बँकेचा निव्वळ नफा 176 कोटी रुपयांचा झाला आहे. त्यामुळे गेल्या 19 एप्रिलला बँकेला रिझर्व्ह बँकेचा परवाना मिळाला. तर गेल्या 30 सप्टेंबरला बँकेनं संचित तोटा पूर्णपणे भरून काढला. तसंच बँकेचा सीआरएआर (CRAR) 8 पूर्णांक 54 टक्के इतका झाला तर एसआलआर (SLR) 40 टक्के झाला. सध्या बँकेची लिक्विडिटी 17 टक्क्यांनी वाढली. त्यामुळे फेब्रुवारी 2013 पूर्वी बँकेवर 21 संचालकांचं मंडळ येऊ शकतं अशी स्थिती आहे. त्यासाठीच येत्या हिवाळी अधिवेशनात सहकार कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. अशा प्रकारे पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात राज्य बँकेला परवाना मिळाला तसंच आता नवं संचालक मंडळही अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2012 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close