S M L

ऊसदरासाठी 'स्वाभिमानी'चा तिरडी मोर्चा

16 नोव्हेंबरकोल्हापूर जिल्ह्यात ऊस दर आंदोलनाची धग अजून कायम आहे. 3 हजारांचा भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी संघर्ष समिती आणि शिवसेनाही आक्रमक झाली आहे. कागलसह चंदगड गडहिंग्लज भुदरगड तालुक्यामध्ये जोरदार आंदोलनं आणि रास्ता रोको करण्यात येत आहेत. चंदगड इथं सरकारच्या निषेधार्थ तिरडी मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आलीय. त्याला प्रत्यत्तर म्हणून पोलिसांकडूनही लाठीमार करण्यात आला. गारगोटीजवळच्या कूर गावात काल एका कार्यकर्त्यांनं आत्मदहनाचाही प्रयत्न केलाय. तर थेरगावजवळ दूध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2012 10:33 AM IST

ऊसदरासाठी 'स्वाभिमानी'चा तिरडी मोर्चा

16 नोव्हेंबर

कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दर आंदोलनाची धग अजून कायम आहे. 3 हजारांचा भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी संघर्ष समिती आणि शिवसेनाही आक्रमक झाली आहे. कागलसह चंदगड गडहिंग्लज भुदरगड तालुक्यामध्ये जोरदार आंदोलनं आणि रास्ता रोको करण्यात येत आहेत. चंदगड इथं सरकारच्या निषेधार्थ तिरडी मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आलीय. त्याला प्रत्यत्तर म्हणून पोलिसांकडूनही लाठीमार करण्यात आला. गारगोटीजवळच्या कूर गावात काल एका कार्यकर्त्यांनं आत्मदहनाचाही प्रयत्न केलाय. तर थेरगावजवळ दूध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2012 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close