S M L

'बाळासाहेबांचं स्मारक 'शिवतीर्था'वरच व्हावं'

19 नोव्हेंबरज्या शिवाजीपार्कवर (शिवतीर्थ') शिवसेनेचा जन्म झाला आणि 46 वर्षांनंतर त्याच शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांना अखेरचा निरोप देण्यात आला. शिवतीर्थ आणि शिवसेना हे एक अतूट नातं आहे. त्यामुळे शिवतीर्थावरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक व्हावं अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूलाच बाळासाहेबांचं स्मारक व्हावं असंही मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे. काल रविवारी बाळासाहेबांवर शासकीय इतमामात शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार केले गेले. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापालिकेतील शिवसेनेचा गट यासाठी प्रयत्न करणार आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासंदर्भात प्रस्ताव आल्यास सकारात्मक निर्णय घेऊ असं नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. तर ठाणे महापालिकेसमोर बाळासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा उभारला जाणार असल्याचा प्रस्तावही अशोक वैती यांनी महासभेत मांडला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2012 10:06 AM IST

'बाळासाहेबांचं स्मारक 'शिवतीर्था'वरच व्हावं'

19 नोव्हेंबर

ज्या शिवाजीपार्कवर (शिवतीर्थ') शिवसेनेचा जन्म झाला आणि 46 वर्षांनंतर त्याच शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांना अखेरचा निरोप देण्यात आला. शिवतीर्थ आणि शिवसेना हे एक अतूट नातं आहे. त्यामुळे शिवतीर्थावरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक व्हावं अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूलाच बाळासाहेबांचं स्मारक व्हावं असंही मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे. काल रविवारी बाळासाहेबांवर शासकीय इतमामात शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार केले गेले. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापालिकेतील शिवसेनेचा गट यासाठी प्रयत्न करणार आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासंदर्भात प्रस्ताव आल्यास सकारात्मक निर्णय घेऊ असं नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. तर ठाणे महापालिकेसमोर बाळासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा उभारला जाणार असल्याचा प्रस्तावही अशोक वैती यांनी महासभेत मांडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2012 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close