S M L

26/11 हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना पाकमध्ये मिळाले प्रशिक्षण

12 नोव्हेंबरमुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं होतं अशी कबुली आता पाकिस्तानी अधिकार्‍यांनी दिली आहे. रावळपिंडीमधल्या कोर्टात 26/11 प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी सुरु आहे. यावेळी साक्ष देताना, पाकिस्तानी अधिकार्‍यांनी हे कबूल केलंय. झाकीर रेहमान लख्वीसह इतर दहशतवाद्यांना, लष्करे-तोयबाच्या कराची, मानसेहरा आणि मुझफ्फराबाद इथल्या छावण्यांमध्ये प्रशिक्षण मिळालं होतं. भारतानं पाकिस्तानी अधिकार्‍यांच्या या विधानाचं स्वागत केलं आहे. पण, लखवीच्या वकिलांनी ही कबुली अमान्य केली आहे. 26/11 च्या हल्ल्यात आजपर्यंत पाकिस्तानने सर्व आरोप फेटाळून लावले होते. आता पाकच्या अधिकार्‍यांनी कबुली दिल्यामुळे या खटल्यात भारताला दिलासा मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2012 11:52 AM IST

26/11 हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना पाकमध्ये मिळाले प्रशिक्षण

12 नोव्हेंबर

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं होतं अशी कबुली आता पाकिस्तानी अधिकार्‍यांनी दिली आहे. रावळपिंडीमधल्या कोर्टात 26/11 प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी सुरु आहे. यावेळी साक्ष देताना, पाकिस्तानी अधिकार्‍यांनी हे कबूल केलंय. झाकीर रेहमान लख्वीसह इतर दहशतवाद्यांना, लष्करे-तोयबाच्या कराची, मानसेहरा आणि मुझफ्फराबाद इथल्या छावण्यांमध्ये प्रशिक्षण मिळालं होतं. भारतानं पाकिस्तानी अधिकार्‍यांच्या या विधानाचं स्वागत केलं आहे. पण, लखवीच्या वकिलांनी ही कबुली अमान्य केली आहे. 26/11 च्या हल्ल्यात आजपर्यंत पाकिस्तानने सर्व आरोप फेटाळून लावले होते. आता पाकच्या अधिकार्‍यांनी कबुली दिल्यामुळे या खटल्यात भारताला दिलासा मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2012 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close