S M L

IACच्या कार्यकर्त्यांचे अंबानींच्या घरासमोर आंदोलन

10 नोव्हेंबरइंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी उद्योगपतींवर आरोप केल्यानंतर आज मुंबईत इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कफ परेड येथील घराजवळ सत्याग्रह आंदोलन केलं. इंडिया अगेंस्ट करप्शनचे मयांक गांधी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी हुतात्मा चौकातल्या एचएसबीसी बँकेसमोरही निदर्शन करण्यात आली. हे आंदोलन लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी अंबानींच्या घराजवळ मोठा बंदोबस्त ठेवला आहे. स्वीस बँकांमध्ये अंबानी बंधुंसह अनेक उद्योजक आणि राजकारणी मिळून एकूण सातशे भारतीयांचा 6000 हजार कोटी काळा पैसा दडवून ठेवण्यात आलांय, असा गौप्यस्फोट अरविंद केजरिवाल यांनी शुक्रवारी दिल्लीत केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2012 09:20 AM IST

IACच्या कार्यकर्त्यांचे अंबानींच्या घरासमोर आंदोलन

10 नोव्हेंबर

इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी उद्योगपतींवर आरोप केल्यानंतर आज मुंबईत इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कफ परेड येथील घराजवळ सत्याग्रह आंदोलन केलं. इंडिया अगेंस्ट करप्शनचे मयांक गांधी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी हुतात्मा चौकातल्या एचएसबीसी बँकेसमोरही निदर्शन करण्यात आली. हे आंदोलन लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी अंबानींच्या घराजवळ मोठा बंदोबस्त ठेवला आहे. स्वीस बँकांमध्ये अंबानी बंधुंसह अनेक उद्योजक आणि राजकारणी मिळून एकूण सातशे भारतीयांचा 6000 हजार कोटी काळा पैसा दडवून ठेवण्यात आलांय, असा गौप्यस्फोट अरविंद केजरिवाल यांनी शुक्रवारी दिल्लीत केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2012 09:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close