S M L

पुजारा-सेहवागचा दणका, इंग्लंड बॅकफूटवर

16 नोव्हेंबरअहमदाबाद टेस्टमध्ये भारतानं पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं आहे. सेहवागची सेंच्युरी आणि चेतेश्वर पुजाराच्या डबल सेंच्युरीच्या जोरावर भारतानं पहिली इनिंग 521 रन्सवर घोषित केली. चेतेश्वर पुजारा 206 रन्सवर नॉटआऊट राहिला आहे. भारतीय बॅट्समननं वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय स्पीन बॉलर्सनंही कमाल केली. भारतीय स्पीन बॉलिंगसमोर इंग्लंडची सुरुवातच डळमळीत झाली. आर अश्विननं नीक कॉम्प्टनला क्लिन बोल्ड करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. तर तिसर्‍या क्रमांकावर बढती मिळालेल्या जेम्स अँडरसनला प्रग्यान ओझानं आऊट करत इंग्लंडची दुसरी विकेट घेतली. अनुभवी जोनाथन ट्रॉट तर भोपळा फोडण्याआधीच अश्विनच्या स्पीनच्या जाळ्यात अडकला. पण यानंतर ऍलिस्टर कुक आणि केविन पीटरसननं दुसरा दिवस खेळून काढला. दिवसअखेर इंग्लंडनं 3 विकेट गमावत 41 रन्स केले असून पहिल्या इनिंगमध्ये 480 रन्सनं ते पिछाडीवर आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2012 03:42 PM IST

पुजारा-सेहवागचा दणका, इंग्लंड बॅकफूटवर

16 नोव्हेंबर

अहमदाबाद टेस्टमध्ये भारतानं पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं आहे. सेहवागची सेंच्युरी आणि चेतेश्वर पुजाराच्या डबल सेंच्युरीच्या जोरावर भारतानं पहिली इनिंग 521 रन्सवर घोषित केली. चेतेश्वर पुजारा 206 रन्सवर नॉटआऊट राहिला आहे. भारतीय बॅट्समननं वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय स्पीन बॉलर्सनंही कमाल केली. भारतीय स्पीन बॉलिंगसमोर इंग्लंडची सुरुवातच डळमळीत झाली. आर अश्विननं नीक कॉम्प्टनला क्लिन बोल्ड करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. तर तिसर्‍या क्रमांकावर बढती मिळालेल्या जेम्स अँडरसनला प्रग्यान ओझानं आऊट करत इंग्लंडची दुसरी विकेट घेतली. अनुभवी जोनाथन ट्रॉट तर भोपळा फोडण्याआधीच अश्विनच्या स्पीनच्या जाळ्यात अडकला. पण यानंतर ऍलिस्टर कुक आणि केविन पीटरसननं दुसरा दिवस खेळून काढला. दिवसअखेर इंग्लंडनं 3 विकेट गमावत 41 रन्स केले असून पहिल्या इनिंगमध्ये 480 रन्सनं ते पिछाडीवर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2012 03:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close