S M L

'बाळासाहेबांवर उपचार सुरू आहेत, शांतता-संयम बाळगा'

15 नोव्हेंबरबाळासाहेबांवर उपचार सुरू आहेत. तुमच्या पाठबळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या संकटातून बाहेर पडतील. दैवी चमत्कारावर माझा विश्वास आहे. कृपा करून परिस्थितीला गालबोट लावू नका. तुमच्यावर माझा विश्वास आहे. शांतता आणि संयम राखा. अशा शब्दात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. बाळासाहेबांनी श्वसनाचा त्रास होता. गेल्या शनिवारापासून तज्ञ डॉक्टरांची टीम मातोश्रीवर दाखल असून बाळासाहेबांवर उपचार सुरु आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते मातोश्रीवर हजर आहे. बाळासाहेबांच्या प्रकृतीची बातमी कळताच हजारो शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर एकच गर्दी केली आहे.'मातोश्री'वरून थेट लाईव्ह कव्हरेज पाहा - आयबीएन लोकमत आणि आयबीएन 7 वर

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2012 01:12 AM IST

'बाळासाहेबांवर उपचार सुरू आहेत, शांतता-संयम बाळगा'

15 नोव्हेंबर

बाळासाहेबांवर उपचार सुरू आहेत. तुमच्या पाठबळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या संकटातून बाहेर पडतील. दैवी चमत्कारावर माझा विश्वास आहे. कृपा करून परिस्थितीला गालबोट लावू नका. तुमच्यावर माझा विश्वास आहे. शांतता आणि संयम राखा. अशा शब्दात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. बाळासाहेबांनी श्वसनाचा त्रास होता. गेल्या शनिवारापासून तज्ञ डॉक्टरांची टीम मातोश्रीवर दाखल असून बाळासाहेबांवर उपचार सुरु आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते मातोश्रीवर हजर आहे. बाळासाहेबांच्या प्रकृतीची बातमी कळताच हजारो शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर एकच गर्दी केली आहे.

'मातोश्री'वरून थेट लाईव्ह कव्हरेज पाहा - आयबीएन लोकमत आणि आयबीएन 7 वर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2012 01:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close