S M L

भारताचा सागरी किनारी आजही असुरक्षित

3 डिसेंबर, मुंबईमुंबईवर अतिरेकी हल्ला झाला. यावेळी अतिरेक्यांनी 1993 प्रमाणंच सागरी मार्गाचा वापर मुंबईत येण्यासाठी केला. पण किनारपट्टी भागातली सुरक्षा व्यवस्था कशी गाफील आहे, याचा आढावा घेणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट."कोस्ट गार्डकडे तीन बोटी आहेत, मात्र ती चालवू शकणारा फक्त एक माणूस आहे. जर बोटी घेतल्या आणि चालवायला माणूसंच नसतील, तर बोटींचा उपयोग काय ?" असा प्रश्न अस्तगर मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष संजय हवलदार यांनी विचारला. हीच परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आमच्या रिपोर्टर्सनी किनारपट्टीचा दौरा केला. इथलं कस्टम ऑफीस म्हणजे एक छोटीशी झोपडी आहे. कस्टम अधिकार्‍याकडचं एकमेव वहान म्हणजे सायकल. त्याच्याकडे साधा फोनही नाही. इथला हवलदार फक्त ऑफीसच नाही तर दहा किलोमीटरच्या भागातली सगळी खेडी आणि किनारपट्टी सांभाळायची जबाबदारी आहे.यानंतर आमचे रिपोर्टर पोहचले ते म्हसळा चेकपोस्टवर. इकडचा हवलदार तर एकदमच गाफील होता. त्यानं आम्हाला उडवाउडवीची उत्तर दिली आणि आपण काम करत असल्याचा आभासही निर्माण केला. यानंतर आमचे रिपोर्टर्स पोहचले ते कस्टमच्या आणखी एका बोटीवर. सीपीडी दामोदरवर. या बोटीनं खर तर रिपोर्टर्सला मुरुडजवळच अडवायला हवं होतं.या बोटीवरचे कस्टम ऑफिसर्स तर चक्क झोपा काढत होते. आमचे रिपोर्टर्स बोटीच्या कंट्रोल रूमवर पोहचले, तिथली उपकरणं हाताळली तरी त्याचा बोटीवरच्या अधिकार्‍यांना पत्ताही लागला नाही.यानंतर आमचे रिपोर्टर परत मुंबईत आले, तेही गाडीमधलं कोणीही न अडवलेलं आणि न तपासलेलं सामान परत घेऊन. पश्चिम किनारपट्टीवर साधारण 400 किलोमीटरचा प्रवास करून आमचे अधिकारी परत मुंबईला आले. एक सर्वसामान्य माणूस जर हा प्रवास करून गेटवे ऑफ इंडियाला पोहचू शकतात, तर अतिरेकीही इथपरंयेत पोहचू शकतात.सीएनएन आयबीएनवर 2005 साली हा रिपोर्ट दाखवण्यात आला होता. मुंबईवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठीही अतिरेक्यांनी पुन्हा एकदा मुंबईपर्यंत पोहचण्यासाठी सागरी मार्गाचा वापर केला. यावरून तीन वर्षात आपल्या सुरक्षाव्यवस्थेत कोणताही बदल झाला नसल्याचं स्पष्ट झालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2008 09:06 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2008 09:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close