S M L

'साहेबांची तब्येत सुधारतेय;काळजी नसावी'

17 नोव्हेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होतं आहे. त्यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली आहे. आजच्या घडीला प्रकृतीत सुधारणा होणं ही आमच्यासाठी आणि समस्त शिवसैनिकांसाठी दिलासादायक बाब आहे. आम्ही अजून आशा सोडलेली नाही. बाळासाहेब बरे होतील असा विश्वास शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केला. तर आम्हाला पुर्ण विश्वास आहे. बाळासाहेब लवकरच आमच्यात येतील. त्यांची तब्येत सुधारत आहे ते आमचे दैवत आहे. सगळ्यांच्या दुवा कामा येतील आणि लवकरच बाळासाहेब आमच्यात येतील असा विश्वास शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला. आज मातोश्रीवर शिवसेना नगरसेवकांची बैठक झाली. मनोहर जोशी आणि दिवाकर रावते या सेनेच्या जेष्ठ नेत्यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. या बैठकीला उद्धव ठाकरे मात्र उपस्थित नव्हते. या बैठकीत नगरसेवकांना बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली गेली. तर बाळासाहेबांसाठी प्रार्थना सुरू ठेवा. पण त्याचबरोबर आपली कामही करत रहा असं सर्व नगरसेवकांना सांगण्यात आलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी बाळासाहेबांची तब्येत चांगली असल्याची माहिती मनोहर जोशी आणि संजय राऊत यांनी दिली. पण त्यानंतरही रात्रभर मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. बाळासाहेबांना एकदा बघू द्या अशी विनंती काही जण करत होते. दरम्यान, बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आजही मातोश्रीवर मान्यवरांची रीघ सुरू आहे. आज सकाळपासून मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीला भेट दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2012 09:27 AM IST

'साहेबांची तब्येत सुधारतेय;काळजी नसावी'

17 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होतं आहे. त्यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली आहे. आजच्या घडीला प्रकृतीत सुधारणा होणं ही आमच्यासाठी आणि समस्त शिवसैनिकांसाठी दिलासादायक बाब आहे. आम्ही अजून आशा सोडलेली नाही. बाळासाहेब बरे होतील असा विश्वास शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केला. तर आम्हाला पुर्ण विश्वास आहे. बाळासाहेब लवकरच आमच्यात येतील. त्यांची तब्येत सुधारत आहे ते आमचे दैवत आहे. सगळ्यांच्या दुवा कामा येतील आणि लवकरच बाळासाहेब आमच्यात येतील असा विश्वास शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला.

आज मातोश्रीवर शिवसेना नगरसेवकांची बैठक झाली. मनोहर जोशी आणि दिवाकर रावते या सेनेच्या जेष्ठ नेत्यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. या बैठकीला उद्धव ठाकरे मात्र उपस्थित नव्हते. या बैठकीत नगरसेवकांना बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली गेली. तर बाळासाहेबांसाठी प्रार्थना सुरू ठेवा. पण त्याचबरोबर आपली कामही करत रहा असं सर्व नगरसेवकांना सांगण्यात आलं आहे.

शुक्रवारी संध्याकाळी बाळासाहेबांची तब्येत चांगली असल्याची माहिती मनोहर जोशी आणि संजय राऊत यांनी दिली. पण त्यानंतरही रात्रभर मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. बाळासाहेबांना एकदा बघू द्या अशी विनंती काही जण करत होते. दरम्यान, बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आजही मातोश्रीवर मान्यवरांची रीघ सुरू आहे. आज सकाळपासून मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीला भेट दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2012 09:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close