S M L

ममतादीदी सरकारविरुद्ध मांडणार अविश्वास ठराव

19 नोव्हेंबरसंसदेचं हिवाळी अधिवेशनाला फक्त दोन दिवस उरले आहेत आणि विरोधक सरकारला घेरण्याची तयारी करत आहेत. एफडीआयच्या मुद्यावर सरकारमधून बाहेर पडलेल्या ममता बॅनर्जी अधिवेशनात सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहेत. या ठरावाला भाजप आणि डाव्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी ममतांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ममतांनी आपल्याशी संपर्क साधल्याचं भाजप नेत्यांनीही मान्य केलं आहे. त्यांनी या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिक्रिया दिलीय. अण्णाद्रमुकच्या अध्यक्ष जयललिता उद्या होणार्‍या बैठकीत याविषयीचा निर्णय घेतील. पण जयललिता ममतांना पाठिंबा देण्याची शक्यता जास्त आहे. ममतांचे राजकीय शत्रू असलेल्या सीपीआयनं मात्र ममतांच्या ठरावाला पाठिंबा देणार असल्याचं अधिकृतपणे सांगितलंय. पण समाजवादी पक्षानं आपले पत्ते अजून उघड केलेले नाहीत. अधिवेशनातच आपली भूमिका स्पष्ट करू, असं समाजवादी पक्षानं म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2012 04:01 PM IST

ममतादीदी सरकारविरुद्ध मांडणार अविश्वास ठराव

19 नोव्हेंबर

संसदेचं हिवाळी अधिवेशनाला फक्त दोन दिवस उरले आहेत आणि विरोधक सरकारला घेरण्याची तयारी करत आहेत. एफडीआयच्या मुद्यावर सरकारमधून बाहेर पडलेल्या ममता बॅनर्जी अधिवेशनात सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहेत. या ठरावाला भाजप आणि डाव्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी ममतांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ममतांनी आपल्याशी संपर्क साधल्याचं भाजप नेत्यांनीही मान्य केलं आहे. त्यांनी या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिक्रिया दिलीय. अण्णाद्रमुकच्या अध्यक्ष जयललिता उद्या होणार्‍या बैठकीत याविषयीचा निर्णय घेतील. पण जयललिता ममतांना पाठिंबा देण्याची शक्यता जास्त आहे. ममतांचे राजकीय शत्रू असलेल्या सीपीआयनं मात्र ममतांच्या ठरावाला पाठिंबा देणार असल्याचं अधिकृतपणे सांगितलंय. पण समाजवादी पक्षानं आपले पत्ते अजून उघड केलेले नाहीत. अधिवेशनातच आपली भूमिका स्पष्ट करू, असं समाजवादी पक्षानं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2012 04:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close