S M L

विरारमध्ये ट्रक घरात घुसला, 2 जण जखमी

17 नोव्हेंबरविरारमधल्या कारगील नगरमध्ये अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रक घरात घुसल्यानं भिंत पडून 2 जण जखमी झाले आहेत. रात्री दीडच्या सुमाराला गुरव कुटुंब गाढ झोपेत असतांना हा ट्रक घरात घुसला. या घटनेनंतर ट्रकचा चालक फरार झाला आहे. दरम्यान, या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी विरार पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांनी नकार दिल्यानं परिसरातल्या लोकांनी ट्रक पेटवून दिला. या अपघातातल्या जखमींना संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून वसई - विरार परिसरात वाळू माफियांची दहशत आहे. ट्रक सावकाश चालवा असे सांगणर्‍यांना धमकावले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2012 09:59 AM IST

विरारमध्ये ट्रक घरात घुसला, 2 जण जखमी

17 नोव्हेंबर

विरारमधल्या कारगील नगरमध्ये अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रक घरात घुसल्यानं भिंत पडून 2 जण जखमी झाले आहेत. रात्री दीडच्या सुमाराला गुरव कुटुंब गाढ झोपेत असतांना हा ट्रक घरात घुसला. या घटनेनंतर ट्रकचा चालक फरार झाला आहे. दरम्यान, या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी विरार पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांनी नकार दिल्यानं परिसरातल्या लोकांनी ट्रक पेटवून दिला. या अपघातातल्या जखमींना संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून वसई - विरार परिसरात वाळू माफियांची दहशत आहे. ट्रक सावकाश चालवा असे सांगणर्‍यांना धमकावले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2012 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close