S M L

सीबीआय प्रश्नी राम जेठमलानींचा भाजपला घरचा अहेर

24 नोव्हेंबरभाजपचे नेते राम जेठमलानी यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा अहेर दिला आहे. सीबीआय संचालकांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं चुकीचं असल्याचं स्पष्ट करत पक्षाचा विरोध खोडून काढला आहे. तसेच जेठमलानी यांनी आपलं नाराजी पत्र नितीन गडकरींना लिहिलं आहे. रणजीत सिन्हा यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती स्थगित करावी, अशी मागणी भाजपनं पंतप्रधानांकडे केली आहे. पण पंतप्रधानांनी भाजपची ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावली आहे. नियमानुसार ही नियुक्ती केल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2012 01:00 PM IST

सीबीआय प्रश्नी राम जेठमलानींचा भाजपला घरचा अहेर

24 नोव्हेंबर

भाजपचे नेते राम जेठमलानी यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा अहेर दिला आहे. सीबीआय संचालकांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं चुकीचं असल्याचं स्पष्ट करत पक्षाचा विरोध खोडून काढला आहे. तसेच जेठमलानी यांनी आपलं नाराजी पत्र नितीन गडकरींना लिहिलं आहे. रणजीत सिन्हा यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती स्थगित करावी, अशी मागणी भाजपनं पंतप्रधानांकडे केली आहे. पण पंतप्रधानांनी भाजपची ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावली आहे. नियमानुसार ही नियुक्ती केल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2012 01:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close