S M L

शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मारकाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

22 नोव्हेंबरदिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधल्या स्मारकाला आता भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. मुंबई महापालिकेच्या विशेष शोक सभेत प्रस्तावाच्या भाषणादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक धनंजय पिसाळ यांनी बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मारकाच्या मागणीला पाठिंबा दिला. तर मुंबई महापालिकेतील काँग्रेस नगरसेविका नयना जोशी यांनी बाळासाहेबांचं नाव दादर स्टेशनला द्यावं अशी मागणी केलीय. याशिवाय शिवडी- न्हावाशेवा सिलिंकला बाळासाहेबांचं नाव द्या, अशी मागणी मुंबई महापालिकेतील सभागृह नेते यशोधर फणसे यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2012 02:16 PM IST

शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मारकाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

22 नोव्हेंबर

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधल्या स्मारकाला आता भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. मुंबई महापालिकेच्या विशेष शोक सभेत प्रस्तावाच्या भाषणादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक धनंजय पिसाळ यांनी बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मारकाच्या मागणीला पाठिंबा दिला. तर मुंबई महापालिकेतील काँग्रेस नगरसेविका नयना जोशी यांनी बाळासाहेबांचं नाव दादर स्टेशनला द्यावं अशी मागणी केलीय. याशिवाय शिवडी- न्हावाशेवा सिलिंकला बाळासाहेबांचं नाव द्या, अशी मागणी मुंबई महापालिकेतील सभागृह नेते यशोधर फणसे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2012 02:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close