S M L

गर्भपात प्रकरणी डॉ.थोरात यांच्याविरुद्ध कारवाईची शिफारस

24 नोव्हेंबरबीड जिल्ह्यातल्या केजमधल्या अवैध गर्भपात प्रकरणी डॉ.अशोक थोरात यांच्याविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. तसा अहवाल जिल्हाधिकार्‍यांनी नेमलेल्या चौकशी समितीनं आरोग्य विभागाच्या अवर सचिवांना पाठवला आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये सेवेत असणार्‍या वैद्यकीय अधिकारी डॉ. लामतुरे यांनी स्वत:च्या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केलं होतं. त्याचं स्टिंग ऑपरेशन डॉ थोरात यांनी केलं होतं. त्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीनं डॉ. लामतुरे यांच्याइतकंच डॉ. थोरातही दोषी असल्याचा अहवाल दिलाय. त्यामुळे डॉ. थोरांतावरही कारवाई करण्याची मागणी या अहवालात करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2012 02:52 PM IST

गर्भपात प्रकरणी डॉ.थोरात यांच्याविरुद्ध कारवाईची शिफारस

24 नोव्हेंबर

बीड जिल्ह्यातल्या केजमधल्या अवैध गर्भपात प्रकरणी डॉ.अशोक थोरात यांच्याविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. तसा अहवाल जिल्हाधिकार्‍यांनी नेमलेल्या चौकशी समितीनं आरोग्य विभागाच्या अवर सचिवांना पाठवला आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये सेवेत असणार्‍या वैद्यकीय अधिकारी डॉ. लामतुरे यांनी स्वत:च्या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केलं होतं. त्याचं स्टिंग ऑपरेशन डॉ थोरात यांनी केलं होतं. त्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीनं डॉ. लामतुरे यांच्याइतकंच डॉ. थोरातही दोषी असल्याचा अहवाल दिलाय. त्यामुळे डॉ. थोरांतावरही कारवाई करण्याची मागणी या अहवालात करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2012 02:52 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close