S M L

'बाळासाहेबांचं स्मारक इंदू मिलमध्ये व्हावं'

22 नोव्हेंबरदिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत नवनवीन मागण्या पुढं येत आहेत. शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं या मागणीसाठी शिवसेना आग्रही असताना मनसेनं मात्र आपली वेगळी भुमिका मांडली आहे. बाळासाहेबांचं स्मारक व्हावं पण ते शिवाजी पार्क ऐवजी इंदू मिलच्या जागेत उभारावं अशी मागणी मनसेचे नगरसेवक संंदीप देशपांडे यांनी केली आहे.बाळासाहेबांचं व्यक्तीमत्व खूप मोठं आहे. त्यामुळे शिवाजी पार्क एक खेळाचं मैदान आहे आणि जागाही खूप कमी आहे. बाळासाहेबांचं आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी इंदू मिलची जागा मोक्याची आहे त्यामुळे तिथेच स्मारक व्हावं अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली. मनसेच्या या मागणीमुळे मात्र महायुतीची पंचाईत झालीय. कारण इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावं अशी मागणी गेल्या वर्षांपासून रिपब्लिकन पार्टी करत आहे. येत्या सहा डिसेंबरच्या आत इंदू मिल बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्यात यावी अन्यथा इंदू मिलवर कब्जा केला जाईल असा इशारा रामदास आठवले यांनी दिला होता. खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही 6 डिसेंबरच्या अगोदर ही इंदू मिल ताब्यात घेतली जाईल असं स्पष्ट केलं होतं. तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कमधल्या स्मारकाला आता भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. मुंबई महापालिकेच्या विशेष शोक सभेत प्रस्तावाच्या भाषणादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक धनंजय पिसाळ यांनी बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मारकाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. मात्र आता मनसेच्या या भूमिकेमुळे स्मारकाच्या प्रकरणाला वेगळं वळणं मिळालंय. राज्यात ठिकठिकाणी बाळासाहेबांचे अनेक स्मारक उभे रहावेत. अशा मागण्या होत आहेतशिवाजी पार्कवर भव्य स्मारक व्हावं - शिवसेनेची मागणीशिवसेनेच्या मागणीला भाजप आणि राष्ट्रवादीचा पाठिंबाइंदू मिलमध्ये भव्य स्मारक व्हावं - मनसेची मागणीकोहिनूर मिलमध्ये स्मारक बांधा - मिलिंद रानडेंची मागणीनाशिकमध्ये स्मारक व्हावं - मनसेची मागणीजालना रोडवर बाळासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार - औरंगाबाद महापालिकेचा ठरावठाणे महापालिकेच्या आवारात पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाचा प्रस्ताव मंजूरमावळमध्ये भाजप आमदार प्रकाश भेगडे उभारणार स्मारकपिंपरी -चिंचवडमध्ये सिंहासनावरचा पुतळा उभा करणार - शिवसेनेने केले जाहीरपुण्यात बाळासाहेबांचं यथोचित स्मारक व्हावं - महापालिकेतील शिवसेनेची मागणीदादर स्टेशनला बाळासाहेबांचं नाव द्यावं - मुंबईतल्या काँग्रेस नगरसेविका नयना जोशींची मागणीशिवडी-न्हावा-शेवा सी-लिंकला बाळासाहेबांचं नाव द्या - शिवसेनेच्या यशोधर फणसेंची मागणीचर्चगेट स्टेशनला बाळासाहेबांचं नाव द्यावं - शिवसेनेच्या रमेश कोरगावकरांची मागणीनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्यावं - भाजपच्या दिलीप पटेल यांची मागणीनाशिकमधल्या नव्या उड्डाणपुलाला बाळासाहेबांचं नाव द्यावं - शिवसेनेची मागणीऔरंगाबाद - संग्रामनगरमधल्या नव्या उड्डाणपुलाला बाळासाहेबांचं नाव द्यावं - शिवसेना आणि भाजपची मागणी

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2012 03:28 PM IST

'बाळासाहेबांचं स्मारक इंदू मिलमध्ये व्हावं'

22 नोव्हेंबर

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत नवनवीन मागण्या पुढं येत आहेत. शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं या मागणीसाठी शिवसेना आग्रही असताना मनसेनं मात्र आपली वेगळी भुमिका मांडली आहे. बाळासाहेबांचं स्मारक व्हावं पण ते शिवाजी पार्क ऐवजी इंदू मिलच्या जागेत उभारावं अशी मागणी मनसेचे नगरसेवक संंदीप देशपांडे यांनी केली आहे.बाळासाहेबांचं व्यक्तीमत्व खूप मोठं आहे. त्यामुळे शिवाजी पार्क एक खेळाचं मैदान आहे आणि जागाही खूप कमी आहे. बाळासाहेबांचं आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी इंदू मिलची जागा मोक्याची आहे त्यामुळे तिथेच स्मारक व्हावं अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली.

मनसेच्या या मागणीमुळे मात्र महायुतीची पंचाईत झालीय. कारण इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावं अशी मागणी गेल्या वर्षांपासून रिपब्लिकन पार्टी करत आहे. येत्या सहा डिसेंबरच्या आत इंदू मिल बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्यात यावी अन्यथा इंदू मिलवर कब्जा केला जाईल असा इशारा रामदास आठवले यांनी दिला होता. खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही 6 डिसेंबरच्या अगोदर ही इंदू मिल ताब्यात घेतली जाईल असं स्पष्ट केलं होतं. तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कमधल्या स्मारकाला आता भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. मुंबई महापालिकेच्या विशेष शोक सभेत प्रस्तावाच्या भाषणादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक धनंजय पिसाळ यांनी बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मारकाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. मात्र आता मनसेच्या या भूमिकेमुळे स्मारकाच्या प्रकरणाला वेगळं वळणं मिळालंय.

राज्यात ठिकठिकाणी बाळासाहेबांचे अनेक स्मारक उभे रहावेत. अशा मागण्या होत आहेत

शिवाजी पार्कवर भव्य स्मारक व्हावं - शिवसेनेची मागणीशिवसेनेच्या मागणीला भाजप आणि राष्ट्रवादीचा पाठिंबाइंदू मिलमध्ये भव्य स्मारक व्हावं - मनसेची मागणीकोहिनूर मिलमध्ये स्मारक बांधा - मिलिंद रानडेंची मागणीनाशिकमध्ये स्मारक व्हावं - मनसेची मागणीजालना रोडवर बाळासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार - औरंगाबाद महापालिकेचा ठरावठाणे महापालिकेच्या आवारात पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाचा प्रस्ताव मंजूरमावळमध्ये भाजप आमदार प्रकाश भेगडे उभारणार स्मारकपिंपरी -चिंचवडमध्ये सिंहासनावरचा पुतळा उभा करणार - शिवसेनेने केले जाहीरपुण्यात बाळासाहेबांचं यथोचित स्मारक व्हावं - महापालिकेतील शिवसेनेची मागणीदादर स्टेशनला बाळासाहेबांचं नाव द्यावं - मुंबईतल्या काँग्रेस नगरसेविका नयना जोशींची मागणीशिवडी-न्हावा-शेवा सी-लिंकला बाळासाहेबांचं नाव द्या - शिवसेनेच्या यशोधर फणसेंची मागणीचर्चगेट स्टेशनला बाळासाहेबांचं नाव द्यावं - शिवसेनेच्या रमेश कोरगावकरांची मागणीनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्यावं - भाजपच्या दिलीप पटेल यांची मागणीनाशिकमधल्या नव्या उड्डाणपुलाला बाळासाहेबांचं नाव द्यावं - शिवसेनेची मागणीऔरंगाबाद - संग्रामनगरमधल्या नव्या उड्डाणपुलाला बाळासाहेबांचं नाव द्यावं - शिवसेना आणि भाजपची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2012 03:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close