S M L

बाळासाहेबांच्या स्मारकाला मैदान बचाव समितीचा विरोध

20 नोव्हेंबरशिवाजी पार्कमध्येच शिवसेनाप्रमुखांचं स्मारक व्हावं अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूलाच बाळासाहेबांचं स्मारक व्हावं असं शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी सोमवारी म्हटलं होतं. पण वेकॉम आणि मैदान बचाव समितीने मात्र खेळाच्या मैदानात स्मारक उभं करायला विरोध केला आहे. बाळासाहेबांचं व्यक्तीमत्व खूप मोठं आहे. शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान आहे. मैदानावर स्मारक करण्यापेक्षा महापौर बंगल्याची जागा व्यवस्थित राहिलं. महापौरांचा बंगला प्रशस्त असून बाहेर जागाही खूप मोठी आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणार्‍या लोकांना जागाही मिळेल असं या समितीचं म्हणणं आहे. तर शिवाजी पार्कऐवजी महापौर बंगल्याच्या आवारात बाळासाहेबांचं मोठं स्मारक उभारलं जावं अशी मागणी शहर विकास अभ्यासक सुधीर बदामी यांनी केली आहे. मात्र स्मारकासाठी महापालिकेतील शिवसेनेचा गट यासाठी प्रयत्न करणार आहे. तर बाळासाहेबांच्या स्मारकासंदर्भात प्रस्ताव आल्यास सकारात्मक निर्णय घेऊ, असं नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2012 10:35 AM IST

बाळासाहेबांच्या स्मारकाला मैदान बचाव समितीचा विरोध

20 नोव्हेंबर

शिवाजी पार्कमध्येच शिवसेनाप्रमुखांचं स्मारक व्हावं अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूलाच बाळासाहेबांचं स्मारक व्हावं असं शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी सोमवारी म्हटलं होतं. पण वेकॉम आणि मैदान बचाव समितीने मात्र खेळाच्या मैदानात स्मारक उभं करायला विरोध केला आहे. बाळासाहेबांचं व्यक्तीमत्व खूप मोठं आहे. शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान आहे. मैदानावर स्मारक करण्यापेक्षा महापौर बंगल्याची जागा व्यवस्थित राहिलं. महापौरांचा बंगला प्रशस्त असून बाहेर जागाही खूप मोठी आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणार्‍या लोकांना जागाही मिळेल असं या समितीचं म्हणणं आहे. तर शिवाजी पार्कऐवजी महापौर बंगल्याच्या आवारात बाळासाहेबांचं मोठं स्मारक उभारलं जावं अशी मागणी शहर विकास अभ्यासक सुधीर बदामी यांनी केली आहे. मात्र स्मारकासाठी महापालिकेतील शिवसेनेचा गट यासाठी प्रयत्न करणार आहे. तर बाळासाहेबांच्या स्मारकासंदर्भात प्रस्ताव आल्यास सकारात्मक निर्णय घेऊ, असं नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2012 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close