S M L

गाडगीळ समितीच्या अहवालाला मुख्यमंत्र्यांचा विरोध

24 नोव्हेंबरकोकणात पर्यावरणाचा विकास करताना विकासाला खिळ बसू नये असं मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय. माधव गाडगीळ समितीच्या शिफारशी स्वीकारल्या तर कोकणचा विकास ठप्प होईल, कोकणाच्या चार जिल्ह्यातील रस्ते,रेल्वे, एअरपोर्ट बांधता येणार नाहीत असं स्पष्ट मत कस्तुरीरंगन आयोगासमोर मांडल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात सांगितलं. हा अहवाल राजकारणी न वाचताच त्याचा अप्रचार करतायत हा गाडगीळांचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळला.अनिल काकोडकर यांनी विधिमंडळामध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर संवाद साधला होता. तशाच प्रकारे पश्चिम घाट अहवालावर विधिमंडळामध्ये गाडगीळ यांनी संवाद साधावा या सूचनेवर आपण विचार करू असंही मुख्यमंत्री म्हणाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2012 03:21 PM IST

गाडगीळ समितीच्या अहवालाला मुख्यमंत्र्यांचा विरोध

24 नोव्हेंबर

कोकणात पर्यावरणाचा विकास करताना विकासाला खिळ बसू नये असं मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय. माधव गाडगीळ समितीच्या शिफारशी स्वीकारल्या तर कोकणचा विकास ठप्प होईल, कोकणाच्या चार जिल्ह्यातील रस्ते,रेल्वे, एअरपोर्ट बांधता येणार नाहीत असं स्पष्ट मत कस्तुरीरंगन आयोगासमोर मांडल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात सांगितलं. हा अहवाल राजकारणी न वाचताच त्याचा अप्रचार करतायत हा गाडगीळांचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळला.अनिल काकोडकर यांनी विधिमंडळामध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर संवाद साधला होता. तशाच प्रकारे पश्चिम घाट अहवालावर विधिमंडळामध्ये गाडगीळ यांनी संवाद साधावा या सूचनेवर आपण विचार करू असंही मुख्यमंत्री म्हणाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2012 03:21 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close