S M L

तिसर्‍या कसोटीसाठी भारतीय टीमची घोषणा

27 नोव्हेंबरवानखेडे स्टेडियमवर लाजिरवाण्या पराभवानंतर पुढील कसोटीसाठी टीममध्ये कोणतीही मोठी फेरबदल न करता जशीच्या तशीच 'घायाळ' टीम इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी टीममध्ये फास्ट बॉलर अशोक दिंडाला संधी देण्यात आली आहे. हा एकमेव बदल सोडल्यास पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये खेळवण्यात आलेली टीमच कायम ठेवण्यात आलीय. मुंबई टेस्टमधल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय टीममध्ये मोठे बदल होतील, अशी शक्यता होती. पण निवड समितीनं टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. येत्या पाच डिसेंबरपासून कोलकत्यात भारत-इंग्लंड दरम्यान तिसरी टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. यानंतर नागपूरला होणार्‍या चौथ्या टेस्ट मॅचसाठी टीम जाहीर करण्यात येणार आहे. अशी आहे भारतीय टेस्ट टीम वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, चेतेश्‍वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, एम एस धोणी, अजिंक्य रहाणे, मुरली विजय, आर अश्विन, प्रग्यान ओझा, हरभजन सिंग, झहीर खान, ईशांत शर्मा आणि अशोक दिंडा

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2012 10:46 AM IST

तिसर्‍या कसोटीसाठी भारतीय टीमची घोषणा

27 नोव्हेंबर

वानखेडे स्टेडियमवर लाजिरवाण्या पराभवानंतर पुढील कसोटीसाठी टीममध्ये कोणतीही मोठी फेरबदल न करता जशीच्या तशीच 'घायाळ' टीम इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी टीममध्ये फास्ट बॉलर अशोक दिंडाला संधी देण्यात आली आहे. हा एकमेव बदल सोडल्यास पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये खेळवण्यात आलेली टीमच कायम ठेवण्यात आलीय. मुंबई टेस्टमधल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय टीममध्ये मोठे बदल होतील, अशी शक्यता होती. पण निवड समितीनं टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. येत्या पाच डिसेंबरपासून कोलकत्यात भारत-इंग्लंड दरम्यान तिसरी टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. यानंतर नागपूरला होणार्‍या चौथ्या टेस्ट मॅचसाठी टीम जाहीर करण्यात येणार आहे.

अशी आहे भारतीय टेस्ट टीम

वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, चेतेश्‍वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, एम एस धोणी, अजिंक्य रहाणे, मुरली विजय, आर अश्विन, प्रग्यान ओझा, हरभजन सिंग, झहीर खान, ईशांत शर्मा आणि अशोक दिंडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2012 10:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close