S M L

उद्धव ठाकरेंची सेना नेत्यांना तंबी

26 नोव्हेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा वाद आता पेटला आहे. शिवाजी पार्कवर स्मारक झालं नाही तर शिवसैनिक कायदा हातात घेतील असं खळबळजणक वक्तव्य शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी केलं होतं. मनोहर जोशींच्या वक्तव्यानंतर कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सेना नेत्यांना चांगलीच तंबी दिली. स्मारकाविषयी कोणीही जाहीर वक्तव्य करु नये पक्षाचा निर्णय अधिकृतपणे जाहीर होईपर्यंत कोणीही स्मारकाबद्दल बोलू नये अशी तंबी देण्यात आली आहे. दरम्यान, दरम्यान सरकारनं मनोहर जोशींच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली. कायद्याचं उल्लंघन होऊ दिलं जाणार नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठणकावून सांगितलंय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर रविवारी मोठ्या शोकाकुळ वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. दुसर्‍या दिवशी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांचं स्मारक शिवाजी पार्कवर उभारण्यात यावं अशी मागणी केली. जोशी सरांच्या या मागणीचा अधिकृत प्रस्ताव आला तर सरकार त्यावर सकारात्मक निर्णय घेईल असं नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी म्हटलं होतं. मात्र स्मारक होणार तर शिवतीर्थावर होणार अशी भुमिका शिवसेनेनं घेतली.मात्र या सर्व प्रकरणावर सरकारने कडक भूमिका घेतली आहे. नियमांनुसार शिवाजी पार्कवर स्मारक बांधता येणार नाही. स्मारकाचा अधिकृत प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे नियमांना मोडून काहीही होणार नाही तसंच आम्हाला कुणाच्या मागणीसाठी नियम मोडण्याची इच्छाही नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2012 09:30 AM IST

उद्धव ठाकरेंची सेना नेत्यांना तंबी

26 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा वाद आता पेटला आहे. शिवाजी पार्कवर स्मारक झालं नाही तर शिवसैनिक कायदा हातात घेतील असं खळबळजणक वक्तव्य शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी केलं होतं. मनोहर जोशींच्या वक्तव्यानंतर कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सेना नेत्यांना चांगलीच तंबी दिली. स्मारकाविषयी कोणीही जाहीर वक्तव्य करु नये पक्षाचा निर्णय अधिकृतपणे जाहीर होईपर्यंत कोणीही स्मारकाबद्दल बोलू नये अशी तंबी देण्यात आली आहे. दरम्यान, दरम्यान सरकारनं मनोहर जोशींच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली. कायद्याचं उल्लंघन होऊ दिलं जाणार नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठणकावून सांगितलंय.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर रविवारी मोठ्या शोकाकुळ वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. दुसर्‍या दिवशी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांचं स्मारक शिवाजी पार्कवर उभारण्यात यावं अशी मागणी केली. जोशी सरांच्या या मागणीचा अधिकृत प्रस्ताव आला तर सरकार त्यावर सकारात्मक निर्णय घेईल असं नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी म्हटलं होतं. मात्र स्मारक होणार तर शिवतीर्थावर होणार अशी भुमिका शिवसेनेनं घेतली.मात्र या सर्व प्रकरणावर सरकारने कडक भूमिका घेतली आहे. नियमांनुसार शिवाजी पार्कवर स्मारक बांधता येणार नाही. स्मारकाचा अधिकृत प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे नियमांना मोडून काहीही होणार नाही तसंच आम्हाला कुणाच्या मागणीसाठी नियम मोडण्याची इच्छाही नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2012 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close