S M L

पुण्यात पे अँड पार्क योजनेवर प्रश्नचिन्ह

3 डिसेंबर, पुणेस्नेहल शास्त्रीपुण्यात जर गाडी चालवली तर कुठेही चालवता येईल असं मजेनं म्हणलं जातं, कारण रस्त्याच्या दोन्हीबाजूला कशाही गाड्यालावलेल्या असतात. यावर उपाय म्हणून पुणे महापालिकेन पे अ‍ॅंड पार्कची पॉलिसी राबवतायत , पण ती पुण्यातल्या छोट्या छोट्या गल्लीत. एक डिसेंबर पासून ही योजना राबवणार असा ठराव महापालिकेच्या सभेत पास झाला पण अनेक ठिकाणी ही पॉलिसी कागदावरच राहिली आहे.पुण्यातले बरेसचे रस्ते कायमचे गजबजलेले असतात. पर्यायी रस्ते म्हणून लोकं आतल्या रस्त्यांतून ये-जा करतात. पण अनेक वेळा इथेही ट्रॅफिक जाम होतो, सर्वसामान्यांच्या या प्रश्नावर पुणे महापालिकेनं सर्वसाधारण सभेत आवाज उठवला. आणि पे अँड पार्क ही योजना पुढे आली. "महानगरपालिकेला पुणे शहरात वाहतूकीच्या प्रश्नावर खुप महत्त्वाचे काम करायला लागणार आहे. त्यातच लोकांकडे गाडी पार्किंगचे नियोजन होत नाही. लोकांना वेळेचं भान रहात नाही. यासाठी खर तर पे अँड पार्कची योजना आहे." असं पुणे महानगरपालिकेच्या महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी सांगितलं.पुण्यातल्या गल्ली बोळांमध्ये पे अँड पार्क ची ही योजना राबवण्यात येतीय. सध्या शनिपार ते शनिवारवाडा, दक्षिणमुखी ते शिवाजी नगर, नदीपात्रातला रस्ता ते हरीहरेश्वर मंदिर इथं ही योजना सुरू आहे. यासाठी पालिकेच्या नावानं कुपनची सिस्टीम तयार करण्यात आली. पालिकेनं ह्या योजनेचं टेंडर गणेश असोसिएटसला दिलय. एका वर्षासाठीचं भाडे तत्वावर दिलेया या टेंडरची किंमत तीन लाख एक्काहत्तर हजार रुपये आहे. या कंपनीनं मासिक पासची रक्कम साडे सातशे ठेवलीय. " नो पार्किंगमधे ज्या गाड्या थांबतात किंवा जे नियम मोडतात त्यांना आम्ही रूपये 500 चा दंड करतो. पावती पालिकेच्या नावाने फाडण्याचा ्‌धिकार आम्हांला दिलाय" असं गणेश असोसिएट्सचे व्यवस्थापक विकास भांबुरे यांनी सांगितलं.पुणेकरांना चारचाकीसाठी पे अँड पार्क ही योजना तशी नवी नाही पण महापालिकेनं ही नव्यानं राबवण्याचं ठरवलं. यावेळी गल्ल्यांमध्ये ती राबवण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी आता एका तासाला पाच रूपये मोजले जाणार आहेत. पण एक गाडी पार्क केली तर दुसरी गाडी जाणार कशी या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही. एकूणच या प्रस्तावाला मंजुरी मिळाली ही पण पुढे याची अंमलबजावणी किती होते यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2008 05:31 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2008 05:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close