S M L

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 500 भाषणं ग्रंथ रुपात भेटीला

27 नोव्हेंबरभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 500 भाषणांचा समावेश असलेल्या 'बोल महामानवाचे' या ग्रंथाचं प्रकाशन सोमवारी पुण्यात करण्यात आलं. केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य नरेंद्र जाधव यांनी ही भाषणं अनुवादीत आणि संपादीत केली आहेत. भारतीय संविधान दिनाचं औचित्य साधून या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांच्या हस्ते तर वनराईचे अध्यक्ष मोहन धारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, दिलीप पाडगावकर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले हजर होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2012 08:23 AM IST

27 नोव्हेंबर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 500 भाषणांचा समावेश असलेल्या 'बोल महामानवाचे' या ग्रंथाचं प्रकाशन सोमवारी पुण्यात करण्यात आलं. केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य नरेंद्र जाधव यांनी ही भाषणं अनुवादीत आणि संपादीत केली आहेत. भारतीय संविधान दिनाचं औचित्य साधून या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांच्या हस्ते तर वनराईचे अध्यक्ष मोहन धारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, दिलीप पाडगावकर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले हजर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2012 08:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close