S M L

'बाळासाहेबांच्या स्मारकावरून वाद नको'

20 नोव्हेंबरआमचे साहेब आम्हाला सोडून गेले. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना त्यात स्मारकारवरून वाद नको मी टीकाकारांना हात जोडून नम्र विनंती करतो यावरून वाद घालू नका.स्मारकाबद्दलचा निर्णय लाखो कडवट शिवसैनिक घेतील. शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिकांमध्ये मी पडणार नाही. संयम राखण्यासाठी सहकार्य करा अशी विनंती शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली. ज्या शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुखांना अखेरचा निरोप देण्यात आला तिथंच, त्यांचं स्मारक व्हावं, अशी मागणी शिवसेनेचे नेते मनोहर जोशींनी केली. त्यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनीही ही मागणी लावून धरली. तर शिवाजी पार्क हे मध्य मुंबईतलं मोकळा श्वास घेण्यासाठी उरलेलं एकमेव मैदान आहे. त्यामुळे या मैदानात स्मारक उभं करायला वेकॉम आणि मैदान बचाव समितीनं विरोध केला आहे. मैदानाच्या जागेवर स्मारक नको, अशी तिथल्या स्थानिकांचीही इच्छा आहे. शिवाजी पार्कऐवजी दुसर्‍या ठिकाणी बाळासाहेबांचं स्मारक बांधलं जावं, असं मत व्यक्त करण्यात येतंय. शिवाजी पार्क हे अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. अनेक दिग्गजांच्या सभा याठिकाणी गाजल्या. तसंच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक खेळाडू याच मैदानावर खेळून नावारुपाला आले. त्यामुळे हे मैदान वाचावं अशी अनेकांची इच्छा आहे. पण बाळासाहेबांचं स्मारक शिवाजी पार्कवरच व्हावं, या मागणीवर शिवसेनेचे नेते ठाम आहेत. उद्धव ठाकरेंनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नेमकं काय म्हटलंय ?'शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा वाद घालण्याची ही वेळ नाही. ठाकरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. शिवसेना परिवार धक्क्यातून सावरलेला नसताना स्मारकाचा वाद का निर्माण व्हावा ? आमच्या सगळ्यांच्याच भावना टीकेचा सूर काढणार्‍यांनी समजून घ्याव्यात. विनाकारण वाद घालणार्‍यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की, त्यांनी कृपया आम्हास संयम राखण्यास सहकार्य करावे. शिवसेनाप्रमुखांच्या अंतिम दर्शनासाठी उसळलेला 25 लाखांचा जनसागर शिस्तीत वागला, त्यांच्या संयमाला आम्ही दाद देतो. स्मारकाबद्दलचा निर्णयसुद्धा हेच लाखो कडवट शिवसैनिक घेतील, शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिकांमध्ये मी पडणार नाही.' - उद्धव ठाकरे

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2012 12:53 PM IST

'बाळासाहेबांच्या स्मारकावरून वाद नको'

20 नोव्हेंबर

आमचे साहेब आम्हाला सोडून गेले. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना त्यात स्मारकारवरून वाद नको मी टीकाकारांना हात जोडून नम्र विनंती करतो यावरून वाद घालू नका.स्मारकाबद्दलचा निर्णय लाखो कडवट शिवसैनिक घेतील. शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिकांमध्ये मी पडणार नाही. संयम राखण्यासाठी सहकार्य करा अशी विनंती शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली. ज्या शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुखांना अखेरचा निरोप देण्यात आला तिथंच, त्यांचं स्मारक व्हावं, अशी मागणी शिवसेनेचे नेते मनोहर जोशींनी केली. त्यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनीही ही मागणी लावून धरली. तर शिवाजी पार्क हे मध्य मुंबईतलं मोकळा श्वास घेण्यासाठी उरलेलं एकमेव मैदान आहे. त्यामुळे या मैदानात स्मारक उभं करायला वेकॉम आणि मैदान बचाव समितीनं विरोध केला आहे. मैदानाच्या जागेवर स्मारक नको, अशी तिथल्या स्थानिकांचीही इच्छा आहे. शिवाजी पार्कऐवजी दुसर्‍या ठिकाणी बाळासाहेबांचं स्मारक बांधलं जावं, असं मत व्यक्त करण्यात येतंय. शिवाजी पार्क हे अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. अनेक दिग्गजांच्या सभा याठिकाणी गाजल्या. तसंच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक खेळाडू याच मैदानावर खेळून नावारुपाला आले. त्यामुळे हे मैदान वाचावं अशी अनेकांची इच्छा आहे. पण बाळासाहेबांचं स्मारक शिवाजी पार्कवरच व्हावं, या मागणीवर शिवसेनेचे नेते ठाम आहेत.

उद्धव ठाकरेंनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नेमकं काय म्हटलंय ?

'शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा वाद घालण्याची ही वेळ नाही. ठाकरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. शिवसेना परिवार धक्क्यातून सावरलेला नसताना स्मारकाचा वाद का निर्माण व्हावा ? आमच्या सगळ्यांच्याच भावना टीकेचा सूर काढणार्‍यांनी समजून घ्याव्यात. विनाकारण वाद घालणार्‍यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की, त्यांनी कृपया आम्हास संयम राखण्यास सहकार्य करावे. शिवसेनाप्रमुखांच्या अंतिम दर्शनासाठी उसळलेला 25 लाखांचा जनसागर शिस्तीत वागला, त्यांच्या संयमाला आम्ही दाद देतो. स्मारकाबद्दलचा निर्णयसुद्धा हेच लाखो कडवट शिवसैनिक घेतील, शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिकांमध्ये मी पडणार नाही.' - उद्धव ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2012 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close