S M L

टू जी घोटाळ्याच्या आकड्याचं गणित चुकलं

23 नोव्हेंबरटू जी प्रकरणातल्या घोटाळ्याच्या आकड्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या प्रकरणाच्या अहवालाशी आणि सांगितलेल्या आकड्यांशी आपला संबंध नसल्याचं कॅगचे माजी ऑडिटर आर.पी.सिंह यांनी म्हटलं आहे. अहवालावर सही करण्यापूर्वी आकड्याबाबत आक्षेप घेतल्याचा दावा सिंह यांनी केला आहे. 2 जी घोटाळ्यात 1 लाख 76 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका कॅगनं ठेवला होता. दरम्यान, आर पी सिंह यांनी तो नाकारल्यानं भाजपचा खरा चेहरा पुढे आलाय असं सोनिया गांधींनी म्हटलं आहे. त्यावर सरकार कॅग आणि संसदेच्या लोकलेखा समितीचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप मुरली मनोहर जोशी यांनी केला आहे. त्यांनी सिंह यांचा दावा फेटाळून लावलाय. सिंह जर त्या आकड्याशी सहमत नव्हते, तर मग त्यांनी त्यावेळी सही का केली असा सवाल जोशी यांनी विचारला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2012 01:46 PM IST

टू जी घोटाळ्याच्या आकड्याचं गणित चुकलं

23 नोव्हेंबर

टू जी प्रकरणातल्या घोटाळ्याच्या आकड्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या प्रकरणाच्या अहवालाशी आणि सांगितलेल्या आकड्यांशी आपला संबंध नसल्याचं कॅगचे माजी ऑडिटर आर.पी.सिंह यांनी म्हटलं आहे. अहवालावर सही करण्यापूर्वी आकड्याबाबत आक्षेप घेतल्याचा दावा सिंह यांनी केला आहे. 2 जी घोटाळ्यात 1 लाख 76 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका कॅगनं ठेवला होता. दरम्यान, आर पी सिंह यांनी तो नाकारल्यानं भाजपचा खरा चेहरा पुढे आलाय असं सोनिया गांधींनी म्हटलं आहे. त्यावर सरकार कॅग आणि संसदेच्या लोकलेखा समितीचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप मुरली मनोहर जोशी यांनी केला आहे. त्यांनी सिंह यांचा दावा फेटाळून लावलाय. सिंह जर त्या आकड्याशी सहमत नव्हते, तर मग त्यांनी त्यावेळी सही का केली असा सवाल जोशी यांनी विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2012 01:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close