S M L

शिवाजी पार्कवर सेनेला एकाच दिवसाची होती परवानगी

29 नोव्हेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील अंत्यसंस्काराच्या जागेवरुन महापालिका प्रशासनानं आपला अहवाल पोलिसांकडे सादर केलाय. या जागेची शिवसेनेला देण्यात आलेली परवानगी ही फक्त 1 दिवसापुरती होती असं या अहवालात नमुद करण्यात आलं आहे. अंत्यसंस्कारासाठी असलेली गर्दी लक्षात घेता शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कारासठी महापालिकेनं परवानगी द्यावी अशी सुचना पोलीस आयुक्तांनी पालिका आयुक्तांना केली होती. यानुसार आयुक्त सीताराम कुंटे यांनी एका दिवसाची परवानगी दिली होती. पण त्यानंतरही शिवसेनेनं तिथे मंडप टाकून ती जागा ताब्यात ठेवल्याचा अहवाल पालिका प्रशासनानं पोलीस आयुक्तांना दिला आहे. मात्र उघडपणे या विषयावर महापालिका अधिकार्‍यांनी बोलायला नकार दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2012 10:35 AM IST

शिवाजी पार्कवर सेनेला एकाच दिवसाची होती परवानगी

29 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील अंत्यसंस्काराच्या जागेवरुन महापालिका प्रशासनानं आपला अहवाल पोलिसांकडे सादर केलाय. या जागेची शिवसेनेला देण्यात आलेली परवानगी ही फक्त 1 दिवसापुरती होती असं या अहवालात नमुद करण्यात आलं आहे. अंत्यसंस्कारासाठी असलेली गर्दी लक्षात घेता शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कारासठी महापालिकेनं परवानगी द्यावी अशी सुचना पोलीस आयुक्तांनी पालिका आयुक्तांना केली होती. यानुसार आयुक्त सीताराम कुंटे यांनी एका दिवसाची परवानगी दिली होती. पण त्यानंतरही शिवसेनेनं तिथे मंडप टाकून ती जागा ताब्यात ठेवल्याचा अहवाल पालिका प्रशासनानं पोलीस आयुक्तांना दिला आहे. मात्र उघडपणे या विषयावर महापालिका अधिकार्‍यांनी बोलायला नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2012 10:35 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close