S M L

26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

26 नोव्हेंबरमुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला आज 4 वर्षं पूर्ण होत आहे. आज पोलीस जिमखान्यावर या हल्ल्यातल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यपाल के. शंकरनारायण, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर आर पाटील, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंसह इतर मान्यवरांनीही यावेळी श्रद्धांजली वाहली. या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकार्‍यांचे कुटुंबियही यावेळी उपस्थित होते. तर नरीमन हाऊसमध्येही आज 26/11 हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी इस्त्रायलचे राजदूतही हजर होते. 26/11 च्या हल्ल्यात, दहशतवाद्यांनी इस्त्रायली धर्म गुरुंचं निवासस्थान असलेल्या नरीमन हाऊस या इमारतीवर हल्ला केला. त्यामध्ये धर्मगुरु आणि त्यांच्या पत्नींचा मृत्यू झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2012 10:51 AM IST

26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

26 नोव्हेंबर

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला आज 4 वर्षं पूर्ण होत आहे. आज पोलीस जिमखान्यावर या हल्ल्यातल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यपाल के. शंकरनारायण, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर आर पाटील, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंसह इतर मान्यवरांनीही यावेळी श्रद्धांजली वाहली. या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकार्‍यांचे कुटुंबियही यावेळी उपस्थित होते. तर नरीमन हाऊसमध्येही आज 26/11 हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी इस्त्रायलचे राजदूतही हजर होते. 26/11 च्या हल्ल्यात, दहशतवाद्यांनी इस्त्रायली धर्म गुरुंचं निवासस्थान असलेल्या नरीमन हाऊस या इमारतीवर हल्ला केला. त्यामध्ये धर्मगुरु आणि त्यांच्या पत्नींचा मृत्यू झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2012 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close