S M L

कोल्हापूर पालिकेत आघाडीत महापौरपदाची आदला-बदली

27 नोव्हेंबरकोल्हापूरच्या महापौर कादंबरी कवाळे यंानी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महापालिकेत सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. या दोन्ही पक्षांनी महापौर आणि उपमहापौर पदांचा अडीच वर्षांचा कालावधी आपसात वाटून घेतलाय. आतापर्यंत राष्ट्रवादीचा महापौर तर काँग्रेसचा उपमहापौर होता. मात्र मुदत संपल्यानं कवाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबतच उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतींनीही आपल्या पदांचा राजीनामा उपायुक्तांकडे सादर केला. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत हे राजीनामे देण्यात आले. पुढच्या महापौरांची निवड लवकरच होणार आहे. त्यामुळे शहराची सूत्रं यापुढे काँग्रेसकडे असणार आहेत. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2012 03:43 PM IST

कोल्हापूर पालिकेत आघाडीत महापौरपदाची आदला-बदली

27 नोव्हेंबर

कोल्हापूरच्या महापौर कादंबरी कवाळे यंानी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महापालिकेत सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. या दोन्ही पक्षांनी महापौर आणि उपमहापौर पदांचा अडीच वर्षांचा कालावधी आपसात वाटून घेतलाय. आतापर्यंत राष्ट्रवादीचा महापौर तर काँग्रेसचा उपमहापौर होता. मात्र मुदत संपल्यानं कवाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबतच उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतींनीही आपल्या पदांचा राजीनामा उपायुक्तांकडे सादर केला. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत हे राजीनामे देण्यात आले. पुढच्या महापौरांची निवड लवकरच होणार आहे. त्यामुळे शहराची सूत्रं यापुढे काँग्रेसकडे असणार आहेत. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2012 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close