S M L

फेसबुक प्रकरणी तरुणींवरचे गुन्हे मागे घेण्याची शक्यता

29 नोव्हेंबरपालघर फेसबुक प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाई झाल्यानंतर शाहीन धाडा आणि रिनू श्रीनिवासन या दोन्ही तरूणींवरचे गुन्हे मागे घेतले जाण्याची शक्यता आहे.अशी माहिती सुत्रांनी आयबीएन-लोकमतला दिली. पोलिसांवर कारवाईनंतर पालघरमध्ये सेनेनं बंद पुकारला होता. प्रकरण आणखी चिघळू नये म्हणून शाहीन धाडा आणि रिनू श्रीनावासन या दोघींनी पालघर सोडलंय. शाहीन धाडा गुजरातला तर रिनू श्रीनिवासन ही चेन्नईला रवाना झाली आहे. हा वाद शांत होईपर्यंत शाहीन गुजरातमध्येच राहणार आहेत. शाहीनचे वडील आणि पालघरमधील व्यावसायिक फारूख धाडा यांनी आपल्यामुळे पालघरमधील वातावरण बिघडू नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. या दोघींच्या कुटुंबीयांना पोलिसांनी संरक्षण देण्यात आलंय. या विषयावर अधिक काही बोलायला ह्या दोघींच्या कुटुंबीयांनी नकार दिला असून हा वाद शांत होईपर्यंत आपल्या मुली पालघर बाहेरच राहतील असं त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2012 11:38 AM IST

फेसबुक प्रकरणी तरुणींवरचे गुन्हे मागे घेण्याची शक्यता

29 नोव्हेंबर

पालघर फेसबुक प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाई झाल्यानंतर शाहीन धाडा आणि रिनू श्रीनिवासन या दोन्ही तरूणींवरचे गुन्हे मागे घेतले जाण्याची शक्यता आहे.अशी माहिती सुत्रांनी आयबीएन-लोकमतला दिली. पोलिसांवर कारवाईनंतर पालघरमध्ये सेनेनं बंद पुकारला होता. प्रकरण आणखी चिघळू नये म्हणून शाहीन धाडा आणि रिनू श्रीनावासन या दोघींनी पालघर सोडलंय. शाहीन धाडा गुजरातला तर रिनू श्रीनिवासन ही चेन्नईला रवाना झाली आहे. हा वाद शांत होईपर्यंत शाहीन गुजरातमध्येच राहणार आहेत. शाहीनचे वडील आणि पालघरमधील व्यावसायिक फारूख धाडा यांनी आपल्यामुळे पालघरमधील वातावरण बिघडू नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. या दोघींच्या कुटुंबीयांना पोलिसांनी संरक्षण देण्यात आलंय. या विषयावर अधिक काही बोलायला ह्या दोघींच्या कुटुंबीयांनी नकार दिला असून हा वाद शांत होईपर्यंत आपल्या मुली पालघर बाहेरच राहतील असं त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2012 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close