S M L

पालघर फेसबुक प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाईची शिफारस

23 नोव्हेंबरपालघरमधल्या फेसबुक प्रकरणी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची शिफारस कोकण विभागाच्या आयजीनी केली आहे. या अधिकार्‍यांची प्रशासकीय आणि खातेनिहाय चौकशी करण्याची शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. हा अहवाल 150 पानाचा असून त्या दोन तरुणींवरचे गुन्हेही मागे घेतले जाणार आहेत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज्यभरात बंद पाळण्यात आला होता. या बंदच्या विरोधात सदरील तरुणींने बंद विरोधात फेसबुकवर कमेंट केली होती. या कमेंटला तिच्या मैत्रीणींनं लाईक केलं. तिच्या या कमेंटमुळे संतप्त शिवसैनिकांनी त्या तरुणींच्या नातेवाईकांच्या हॉस्पिटलची तोडफोड केली आणि तरुणींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनीही तातडीने कारवाई करत या दोन्ही तरुणीला अटक करण्यात आली. मात्र या अटकेचे तीव्र पडसाद उमटले. प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जस्टीस मार्कंडेय काटजू यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दोषी पोलिसांवर कारवाई करावी प्रकरणीची चौकशी करावी अशी मागणी केली होती. दरम्यान, दोन्ही तरुणींची जामिनावर सुटका झाली असून दोन्ही मुलींनी झालेल्या प्रकारबद्दल माफी मागितली पण अटक अयोग्य होती असंही या मुलींचं म्हणणं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2012 04:10 PM IST

पालघर फेसबुक प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाईची शिफारस

23 नोव्हेंबर

पालघरमधल्या फेसबुक प्रकरणी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची शिफारस कोकण विभागाच्या आयजीनी केली आहे. या अधिकार्‍यांची प्रशासकीय आणि खातेनिहाय चौकशी करण्याची शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. हा अहवाल 150 पानाचा असून त्या दोन तरुणींवरचे गुन्हेही मागे घेतले जाणार आहेत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज्यभरात बंद पाळण्यात आला होता. या बंदच्या विरोधात सदरील तरुणींने बंद विरोधात फेसबुकवर कमेंट केली होती. या कमेंटला तिच्या मैत्रीणींनं लाईक केलं. तिच्या या कमेंटमुळे संतप्त शिवसैनिकांनी त्या तरुणींच्या नातेवाईकांच्या हॉस्पिटलची तोडफोड केली आणि तरुणींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनीही तातडीने कारवाई करत या दोन्ही तरुणीला अटक करण्यात आली. मात्र या अटकेचे तीव्र पडसाद उमटले. प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जस्टीस मार्कंडेय काटजू यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दोषी पोलिसांवर कारवाई करावी प्रकरणीची चौकशी करावी अशी मागणी केली होती. दरम्यान, दोन्ही तरुणींची जामिनावर सुटका झाली असून दोन्ही मुलींनी झालेल्या प्रकारबद्दल माफी मागितली पण अटक अयोग्य होती असंही या मुलींचं म्हणणं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2012 04:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close