S M L

FDI प्रश्नी सरकारला तात्पुरता दिलासा

26 नोव्हेंबरसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आणि विरोधकांनी एफडीआयच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरत संसदेच कामकाज बंद पाडलं. आज तिसर्‍या दिवशीही विरोधक आपल्या भुमिकेवर ठाम राहत संसदेत कामकाज बंद पाडलं. ज्यांच्या पाठिंब्यावर हे सरकार तरलंय, त्या बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षांनी सरकारला दिलासा दिला आहे. सरकार अडचणीत येणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे एफडीआयवर मतदानाची मागणी करून सरकारला कोंडीत पकडण्याच्या भाजपच्या रणनीतीला धक्का बसलाय. त्यातच, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनंही सरकारला आश्चर्याचा धक्का दिला आहे. आजच्या सर्वपक्षीय बैठकीत तृणमूलनं मतदानाचा मुद्दा लावून धरला नाही. यामुळे एनडीए आणि कम्युनिस्ट पक्ष एकटे पडल्याचंं चित्र आहे. पण, त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्वपक्षीय बैठकीतून आज काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे संसदेतला गदारोळ उद्याही कायम राहण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यारून आज दोन्ही सभागृहांचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं. थेट परकीय गुंतवणुकीवर नियम 184 अंतर्गत चर्चा करावी की नाही, यावर वाद रंगलाय. नियम 184 अंतर्गत एखाद्या मुद्द्यावर चर्चा झाल्यावर मतदान घेतलं जातं. सरकार चर्चेला तर तयार आहे पण मतदानाला नाही आणि हीच मोठी अडचण आहे. आजच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर कोणत्या पक्षानं नियम 184 ला पाठिंबा दिलाय आणि कुणाचा विरोध आहे ? थेट परकीय गुंतवणुकीचा तिढाएनडीए : भाजप + संयुक्त जनता दल + शिवसेना + अकाली दल- डावे पक्ष : सीपीएम + सीपीआय + फॉरवर्ड ब्लॉक- बिजू जनता दल- अण्णा द्रमुकनियम 184ची अट नाही- तृणमूल काँग्रेसनियम 184 : सभागृह अध्यक्षांनी ठरवावं- समाजवादी पक्ष- बहुजन समाज पक्ष- राष्ट्रीय जनता दल - लोक जनशक्ती पक्ष नियम 184ला स्पष्ट विरोध- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस- राष्ट्रीय लोक दल- द्रमुक- नॅशनल कॉन्फरन्स

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2012 01:31 PM IST

FDI प्रश्नी सरकारला तात्पुरता दिलासा

26 नोव्हेंबर

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आणि विरोधकांनी एफडीआयच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरत संसदेच कामकाज बंद पाडलं. आज तिसर्‍या दिवशीही विरोधक आपल्या भुमिकेवर ठाम राहत संसदेत कामकाज बंद पाडलं. ज्यांच्या पाठिंब्यावर हे सरकार तरलंय, त्या बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षांनी सरकारला दिलासा दिला आहे. सरकार अडचणीत येणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे एफडीआयवर मतदानाची मागणी करून सरकारला कोंडीत पकडण्याच्या भाजपच्या रणनीतीला धक्का बसलाय. त्यातच, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनंही सरकारला आश्चर्याचा धक्का दिला आहे. आजच्या सर्वपक्षीय बैठकीत तृणमूलनं मतदानाचा मुद्दा लावून धरला नाही. यामुळे एनडीए आणि कम्युनिस्ट पक्ष एकटे पडल्याचंं चित्र आहे. पण, त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्वपक्षीय बैठकीतून आज काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे संसदेतला गदारोळ उद्याही कायम राहण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यारून आज दोन्ही सभागृहांचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं.

थेट परकीय गुंतवणुकीवर नियम 184 अंतर्गत चर्चा करावी की नाही, यावर वाद रंगलाय. नियम 184 अंतर्गत एखाद्या मुद्द्यावर चर्चा झाल्यावर मतदान घेतलं जातं. सरकार चर्चेला तर तयार आहे पण मतदानाला नाही आणि हीच मोठी अडचण आहे. आजच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर कोणत्या पक्षानं नियम 184 ला पाठिंबा दिलाय आणि कुणाचा विरोध आहे ?

थेट परकीय गुंतवणुकीचा तिढाएनडीए : भाजप संयुक्त जनता दल शिवसेना अकाली दल- डावे पक्ष : सीपीएम सीपीआय फॉरवर्ड ब्लॉक- बिजू जनता दल- अण्णा द्रमुक

नियम 184ची अट नाही- तृणमूल काँग्रेस

नियम 184 : सभागृह अध्यक्षांनी ठरवावं- समाजवादी पक्ष- बहुजन समाज पक्ष- राष्ट्रीय जनता दल - लोक जनशक्ती पक्ष

नियम 184ला स्पष्ट विरोध- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस- राष्ट्रीय लोक दल- द्रमुक- नॅशनल कॉन्फरन्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2012 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close