S M L

नाशिक जिल्हापरिषदेत विरोधकांचं 36 तासांपासून ठिय्या आंदोलन

30 नोव्हेंबरनाशिक जिल्हापरिषदेत शिवसेनेसह 27 विरोधकांचं गेल्या 36 तासांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे. जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार निधीवाटपाबाबत पक्षपातीपणा करत असल्याची त्यांची तक्रार आहे. उपलब्ध निधीपैकी सत्ताधार्‍यांना 70 टक्के निधीचं वाटप केलं आणि विरोधकांना 30 टक्के निधी देण्यात आला म्हणून नाराज विरोधकांनी हे आंदोलन सुरु केलं. याबाबत वेळोवेळी निवेदनं देऊही फरक न पडल्यानं या सदस्यांनी कालच्या बैठकीपासून सभागृहातच ठाण मांडलंय. गेल्या 36 तासांपासून सदस्यांनी सभागृहातच मुक्काम केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 30, 2012 04:09 PM IST

नाशिक जिल्हापरिषदेत विरोधकांचं 36 तासांपासून ठिय्या आंदोलन

30 नोव्हेंबर

नाशिक जिल्हापरिषदेत शिवसेनेसह 27 विरोधकांचं गेल्या 36 तासांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे. जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार निधीवाटपाबाबत पक्षपातीपणा करत असल्याची त्यांची तक्रार आहे. उपलब्ध निधीपैकी सत्ताधार्‍यांना 70 टक्के निधीचं वाटप केलं आणि विरोधकांना 30 टक्के निधी देण्यात आला म्हणून नाराज विरोधकांनी हे आंदोलन सुरु केलं. याबाबत वेळोवेळी निवेदनं देऊही फरक न पडल्यानं या सदस्यांनी कालच्या बैठकीपासून सभागृहातच ठाण मांडलंय. गेल्या 36 तासांपासून सदस्यांनी सभागृहातच मुक्काम केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2012 04:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close