S M L

कृषी अधिकार्‍याला शेतकर्‍यांनी काळं फासलं

26 नोव्हेंबरजळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कृषी अधिकारी बैसाणे यांच्या तोंडाला शेतकर्‍यांनी काळं फासण्याची घटना घडली आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी राबविण्यात येणार्‍या मेगा योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना साहित्य वितरीत करण्यात येतं. या साहित्याच्या खरेदीत कृषी अधिकार्‍यांनी घोटाळा केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केलाय. आमदार गिरीष महाजन यांच्यासह शेकडो शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांसमोर या अधिकार्‍यांचा हा घोटाळा उघड केला. पाणलोट प्रकल्प एकात्मिक योजनेअंतर्गत जवळपास 30 पटीनं भांडी खरेदी करुन खोटी बीलं सादर केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. कृषी अधिकारी बैसाणे आणि आमले यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप आमदार महाजन यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2012 02:00 PM IST

कृषी अधिकार्‍याला शेतकर्‍यांनी काळं फासलं

26 नोव्हेंबर

जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कृषी अधिकारी बैसाणे यांच्या तोंडाला शेतकर्‍यांनी काळं फासण्याची घटना घडली आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी राबविण्यात येणार्‍या मेगा योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना साहित्य वितरीत करण्यात येतं. या साहित्याच्या खरेदीत कृषी अधिकार्‍यांनी घोटाळा केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केलाय. आमदार गिरीष महाजन यांच्यासह शेकडो शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांसमोर या अधिकार्‍यांचा हा घोटाळा उघड केला. पाणलोट प्रकल्प एकात्मिक योजनेअंतर्गत जवळपास 30 पटीनं भांडी खरेदी करुन खोटी बीलं सादर केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. कृषी अधिकारी बैसाणे आणि आमले यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप आमदार महाजन यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2012 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close