S M L

सोलापूरात वरिष्ठांच्या छळाला कंटाळून नर्सेसचा आत्महत्येचा प्रयत्न

3 डिसेंबर, सोलापूर सिध्दार्थ गोदाम सोलापुरात तीन शिकाऊ नर्सेसनी रँगिंगला आणि वरिष्ठाच्या धमकीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना काल रात्री सोलापूर सिव्हिल हॅास्पिटलमध्ये घडली. या तिघीपैंकी दोघीची प्रकृती चिंताजनक आहे. दीपाली कुंभार, प्रज्ञा जगताप आणि सुधा तुपे असं या नर्सेसची नावं आहेत. या तिघींनी काल रात्री आठ वाजता हॉस्टेलमध्ये झोपेचं इन्जेक्शन टोचून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दीपाली कुंभार हीने लिहिलेल्या चिठ्ठीत वरिष्ठांचा मानसिक छळ आणि इतर विद्यार्थी याच्या छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचं म्हटलंय. मात्र दवाखान्याचे डीन डॉ. अशोक शिदे यानी रॅगिंग चा प्रकार नसल्याचं सागितलं आहे. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रॅगिगच्या घटना घडत असतात. दोन वर्षाआधी रँगिंग ला कंटाळून शिकाऊ डॉक्टरने आत्महत्या केली होती.या तीनही नर्सेसनीही रँगिंगला आणि वरिष्ठांच्या धमकीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने हा प्रकार दडपवण्याचा प्रयत्न चालवला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2008 12:06 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2008 12:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close