S M L

'शिवसेनाप्रमुख फक्त बाळासाहेब ठाकरेच'

02 डिसेंबरशिवसेनाप्रमुख हे फक्त बाळासाहेब ठाकरेच. तेच शिवसेनाप्रमुख तेच हिदुह्रदयसम्राट..या सर्व बिरुदावल्या त्यांच्यासाठीच निर्माण झाल्या व त्यांनाच शोभून दिसल्या. शिवसेनाप्रमुख हे एकमेव आणि एकमेवाद्वितीय. दुसरे शिवसेनाप्रमुख निर्माण होणे नाही असं स्पष्टीकरण शिवसेनाकार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिलं. गेल्याकाही दिवसांपासून शिवसेनाप्रमुख कोण यावर चर्चा सुरु झाल्या होत्या आज शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'ला उद्धव ठाकरेंनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुखपदाच्या प्रश्नावर पडदा टाकला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. बाळासाहेबांच्या जाण्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पोकळी हा शब्द कमी आहे. लोकांच्या भावनाच वर्णन करता येणार नाही. 'मॉ' गेल्यनंतरची आठवण आहे. तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, माशांचे अश्रू दिसत नाहीत, काही वेळेला हे दु:ख गिळावं लागतं किंवा गिळल्यासारखं दाखवावं लागतं. हे दु:ख तर कायमचे राहणार. अजूनही ज्या वेळेला एकटा बसतो त्या वेळेला आठवणी दाटून येतात. साहेब सोबत आहेत असंच वाटतं आणि त्यांना भेटण्याची ओढ दाटून येते अशा भावनाही उद्धव यांनी व्यक्त केल्या. तसेच साहेबांना निरोप देण्यासाठी राज्यभरातून लाखों लोकं आली. त्यांना भेटणं माझं कर्तव्य आहे. यासाठी मी राज्याचा दौरा करणार आहे. तसेच बाळासाहेबांच्या स्मारकावरचा वाद अकारण आहे. सुरूवातीलाच मी स्मारकावर वाद घालू नये अशी विनंती केली होती आणि कोणीही यावर वाद घालूही नये स्मारकावर वाद करण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये ? असा सवालही उद्धव यांनी केला. तसंच शिवसेनाही बाळासाहेबांचीच आहे. बाळासाहेबांच्या विचारांची आहे. मी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्याच मार्गावरून शिवसेना पुढे जाईल असा विश्वास ही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 2, 2012 10:29 AM IST

'शिवसेनाप्रमुख फक्त बाळासाहेब ठाकरेच'

02 डिसेंबर

शिवसेनाप्रमुख हे फक्त बाळासाहेब ठाकरेच. तेच शिवसेनाप्रमुख तेच हिदुह्रदयसम्राट..या सर्व बिरुदावल्या त्यांच्यासाठीच निर्माण झाल्या व त्यांनाच शोभून दिसल्या. शिवसेनाप्रमुख हे एकमेव आणि एकमेवाद्वितीय. दुसरे शिवसेनाप्रमुख निर्माण होणे नाही असं स्पष्टीकरण शिवसेनाकार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिलं. गेल्याकाही दिवसांपासून शिवसेनाप्रमुख कोण यावर चर्चा सुरु झाल्या होत्या आज शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'ला उद्धव ठाकरेंनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुखपदाच्या प्रश्नावर पडदा टाकला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. बाळासाहेबांच्या जाण्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पोकळी हा शब्द कमी आहे. लोकांच्या भावनाच वर्णन करता येणार नाही. 'मॉ' गेल्यनंतरची आठवण आहे. तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, माशांचे अश्रू दिसत नाहीत, काही वेळेला हे दु:ख गिळावं लागतं किंवा गिळल्यासारखं दाखवावं लागतं. हे दु:ख तर कायमचे राहणार. अजूनही ज्या वेळेला एकटा बसतो त्या वेळेला आठवणी दाटून येतात. साहेब सोबत आहेत असंच वाटतं आणि त्यांना भेटण्याची ओढ दाटून येते अशा भावनाही उद्धव यांनी व्यक्त केल्या. तसेच साहेबांना निरोप देण्यासाठी राज्यभरातून लाखों लोकं आली. त्यांना भेटणं माझं कर्तव्य आहे. यासाठी मी राज्याचा दौरा करणार आहे. तसेच बाळासाहेबांच्या स्मारकावरचा वाद अकारण आहे. सुरूवातीलाच मी स्मारकावर वाद घालू नये अशी विनंती केली होती आणि कोणीही यावर वाद घालूही नये स्मारकावर वाद करण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये ? असा सवालही उद्धव यांनी केला. तसंच शिवसेनाही बाळासाहेबांचीच आहे. बाळासाहेबांच्या विचारांची आहे. मी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्याच मार्गावरून शिवसेना पुढे जाईल असा विश्वास ही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2012 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close