S M L

'स्मारक नसो पण समाधीस्थळ शिवाजी पार्कच'

03 डिसेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी गेल्या काही दिवसांपासून हट्ट धरून बसलेल्या शिवसेना नेत्यांनी रविवारी नरमाई घेत स्मारक इतर ठिकाणी बनवण्यास अनुमती देत वादावर पडदा टाकला. पण बाळासाहेबांचं स्मारक इतर ठिकाणी उभारण्यात येईल पण समाधीस्थळ शिवाजी पार्कच राहिल अशी नवी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.दादर येथे शिवाजी पार्कचा जन्म झाल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला सभा घेतली. बाळासाहेबांच्या या सभेनंतर शिवाजी पार्क नावारुपाला आलं. ही सभा शिवसेनेची पहिली सभा होती त्यामुळे शिवसेना आणि शिवाजी पार्क असं नातंच तयार झालं. मात्र 46 वर्षांनंतर 'शिवतीर्था'वर बाळासाहेबांना अखेरचा देण्यात आला. दुसर्‍याच दिवशी शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कवर व्हावे अशी मागणी केली. त्यांच्यापाठोपाठ संजय राऊत यांनीही स्मारकासाठी मागणी केली. मात्र सेनेच्या या मागणीला दादरवासीयांनी विरोध केला. संपूर्ण दादर परीसरात एकमेव उरलेलं मैदान फक्त शिवाजी पार्कच. या मैदानावर सचिन तेंडुलकर,विनोद कांबळी सारखे क्रिकेटपटू घडले त्यामुळे दादरवासीयांनी याला स्पष्ट शब्दात विरोध केला. हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र स्मारकासाठी कायदाही हातात घेऊ असा इशारा जोशी सरांनी दिला. जोशीसंराच्या इशार्‍याची दखल घेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणीही कायदा हातात घेऊ नये. शिवाजी पार्कवर नियमानुसार स्मारक होऊ शकत नाही असं स्पष्ट केलं. अखेर काल रविवारी संजय राऊत यांनी शिवतीर्थावर बाळासाहेबांचं स्मारक होणार नाही पण अंत्यसंस्काराची जागा पवित्र स्थळ आहे अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली होती पण आज अचानक आपल्या भूमिकेवरून पलटी घेत साहेबांचं स्मारक इतर ठिकाणी जरी उभारण्यात आलं तरी समाधीस्थळ शिवाजी पार्कच असेल अशी नवी भूमिका घेतली आहे. आजपासून शिवसेनाकार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा राज्यव्यापी दौर्‍याला सुरुवात केली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या मागणीबाबत उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेता याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2012 05:36 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2012 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close