S M L

पाण्याअभावी परळी औष्णिक केंद्र बंद पडण्याची शक्यता

29 नोव्हेंबरमुळा, भंडारदरा आणि दारणा धरणातून मराठवाडयाला पाणी 9 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राला पाणी देता येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे मराठवाड्याला पाणी टंचाईनंतर वीज टंचाईला सामोरं जावं लागणार आहे.अगोदरच पाण्याविना परळी केंद्राचे दोन युनिट बंद आहेत शिवाय जवळ असलेल्या खडका धरणातून फक्त 15 डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठा होऊ शकणार आहे. त्यानंतर मात्र विद्युत केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आता जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा होऊ शकत नाही असं औरंगाबादच्या कडा ऑफिसचे शाखा अभियंता जयसिंगराव हिरे स्पष्ट केलंय. त्यामुळं परळीचे चालू असलेले आणखी 3 युनिट 15 डिसेंबरनंतर चालतील की नाही यावर प्रश्नचिन्ह उभं ठाकलाय. नगर आणि नाशिक मधून मिळालेल्या पाण्यातून पिण्यासाठी आणि एमआयडीसीला देण्यात येणार असल्याचंही जयसिंगराव हिरे यांनी सांगितलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2012 01:29 PM IST

पाण्याअभावी परळी औष्णिक केंद्र बंद पडण्याची शक्यता

29 नोव्हेंबर

मुळा, भंडारदरा आणि दारणा धरणातून मराठवाडयाला पाणी 9 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राला पाणी देता येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे मराठवाड्याला पाणी टंचाईनंतर वीज टंचाईला सामोरं जावं लागणार आहे.अगोदरच पाण्याविना परळी केंद्राचे दोन युनिट बंद आहेत शिवाय जवळ असलेल्या खडका धरणातून फक्त 15 डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठा होऊ शकणार आहे. त्यानंतर मात्र विद्युत केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आता जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा होऊ शकत नाही असं औरंगाबादच्या कडा ऑफिसचे शाखा अभियंता जयसिंगराव हिरे स्पष्ट केलंय. त्यामुळं परळीचे चालू असलेले आणखी 3 युनिट 15 डिसेंबरनंतर चालतील की नाही यावर प्रश्नचिन्ह उभं ठाकलाय. नगर आणि नाशिक मधून मिळालेल्या पाण्यातून पिण्यासाठी आणि एमआयडीसीला देण्यात येणार असल्याचंही जयसिंगराव हिरे यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2012 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close