S M L

इंदू मिलबाबत मुख्यमंत्र्यांचं कोरडं आश्वासन

03 डिसेंबरडॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळेल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलंय पण ती कधी मिळणार याचं उत्तर मात्र देण्यास मात्र त्यांनी टाळलंय. मागील शनिवारी रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी दिल्लीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 4 ते 5 डिसेंबर रोजी संसदेत घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली. मात्र 4 तारीख उद्यावर येऊन ठेपला असताना अजूनही कोणत्याही हालचालीना वेग न आल्यामुळे दलित संघटनेत चिंतेचं वातावरण पसरलंय. 6 डिसेंबरपर्यंत जागा नाही मिळाली, तर मिल ताब्यात घेऊ असा इशारा रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी दिला होता. त्यामुळे इंदू मिलचा वाद संपवण्याची चिन्हं दिसत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2012 03:31 PM IST

इंदू मिलबाबत मुख्यमंत्र्यांचं कोरडं आश्वासन

03 डिसेंबर

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळेल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलंय पण ती कधी मिळणार याचं उत्तर मात्र देण्यास मात्र त्यांनी टाळलंय. मागील शनिवारी रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी दिल्लीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 4 ते 5 डिसेंबर रोजी संसदेत घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली. मात्र 4 तारीख उद्यावर येऊन ठेपला असताना अजूनही कोणत्याही हालचालीना वेग न आल्यामुळे दलित संघटनेत चिंतेचं वातावरण पसरलंय. 6 डिसेंबरपर्यंत जागा नाही मिळाली, तर मिल ताब्यात घेऊ असा इशारा रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी दिला होता. त्यामुळे इंदू मिलचा वाद संपवण्याची चिन्हं दिसत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2012 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close