S M L

फेसबुकवर राज ठाकरेंविरोधात कमेंट, एक जण ताब्यात

28 नोव्हेंबरपालघरमधील फेसबुक प्रकरण एकीकडे चिघळले असताना आणखी एका फेसबुकबहाद्दराने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट टाकल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी पालघरमधील मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी एका तरूणांला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.सुनिल विश्वकर्मा असं या तरुणांचं नाव आहे. या तरुणांची चौकशी केली जात आहे. . या तरूणांने मंगळवारी रात्री राज ठाकरे यांच्याविरोधात फेसबुकवर अश्लिल भाषेत कमेंट अपडेट केली. त्यामुळे सुनील विश्वकर्माविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून कडक कारवाई व्हावी अशी मागणी कुंदन संख्ये यांनी केली आहे. मागिल आठवड्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर बंद पाळण्यात आला होता. या बंद विरोधात शाहीन धडा या तरूणींने फेसबुकवर कमेंट अपडेट केली होती. तिच्या या कमेंटला तिच्या मैत्रींनी लाईक केलं. या कमेंटमुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. आणि शाहीनच्या नातेवाईकाच्या हॉस्पिटलची तोडफोड केली होती. याप्रकरणी शाहीन आणि तिच्या मैत्रींनीला अटक करून जामीन देण्यात आला. फेसबुकवर कमेंट टाकली म्हणून तरूणींना अटक का करण्यात आली या प्रश्नी सामाजिक संघटनेनी प्रशासनाला जाब विचारला. अखेरीस काल मंगळवारी ठाणे ग्रामीणचे एसपी रवींद्र सेनगावकर आणि इन्स्पेक्टर श्रीकांत पिंगळे यांना निलंबित केलं आहे. पोलिसांवर झालेल्या कारवाईच्या विरोधात आज पालघरमध्ये शिवसेनेनं बंद पुकारला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2012 11:30 AM IST

फेसबुकवर राज ठाकरेंविरोधात कमेंट, एक जण ताब्यात

28 नोव्हेंबर

पालघरमधील फेसबुक प्रकरण एकीकडे चिघळले असताना आणखी एका फेसबुकबहाद्दराने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट टाकल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी पालघरमधील मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी एका तरूणांला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.सुनिल विश्वकर्मा असं या तरुणांचं नाव आहे. या तरुणांची चौकशी केली जात आहे. . या तरूणांने मंगळवारी रात्री राज ठाकरे यांच्याविरोधात फेसबुकवर अश्लिल भाषेत कमेंट अपडेट केली. त्यामुळे सुनील विश्वकर्माविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून कडक कारवाई व्हावी अशी मागणी कुंदन संख्ये यांनी केली आहे.

मागिल आठवड्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर बंद पाळण्यात आला होता. या बंद विरोधात शाहीन धडा या तरूणींने फेसबुकवर कमेंट अपडेट केली होती. तिच्या या कमेंटला तिच्या मैत्रींनी लाईक केलं. या कमेंटमुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. आणि शाहीनच्या नातेवाईकाच्या हॉस्पिटलची तोडफोड केली होती. याप्रकरणी शाहीन आणि तिच्या मैत्रींनीला अटक करून जामीन देण्यात आला. फेसबुकवर कमेंट टाकली म्हणून तरूणींना अटक का करण्यात आली या प्रश्नी सामाजिक संघटनेनी प्रशासनाला जाब विचारला. अखेरीस काल मंगळवारी ठाणे ग्रामीणचे एसपी रवींद्र सेनगावकर आणि इन्स्पेक्टर श्रीकांत पिंगळे यांना निलंबित केलं आहे. पोलिसांवर झालेल्या कारवाईच्या विरोधात आज पालघरमध्ये शिवसेनेनं बंद पुकारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2012 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close