S M L

अंकुश लांडगे खूनप्रकरणी मुख्य आरोपींची निर्घुण हत्या

29 नोव्हेंबरपिंपरी चिंचवडचे भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष ऍड.अंकुश लांडगे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपी गोट्या ऊर्फ सचिन धावडे आणि त्याचा मित्र अंकुश लकडे याचा आज निर्घुणपणे खून करण्यात आला. दहा ते बाराजणांनी गोळीबार करत धारदार शस्त्रानं या दोघांवर हल्ला चढवला. या घटनेत सचिन धावडे आणि त्याच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा आणखी एक मित्र संदीप मधुरे गंभीर जखमी झाला आहे. भोसरीतील धावडेवस्तीमध्ये दुपारी बाराच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे तणावाचे वातावरण पसरले आहे. 2006 मध्ये अंकुश लांडगे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सचिन धावडे हा मुख्य आरोपी होता. प्रकरणाच्या सहा वर्षांनंतर आज दोघांची हत्या करण्यात आली. हा हल्ला कोणी केला याचा तपास पोलीस करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2012 03:46 PM IST

अंकुश लांडगे खूनप्रकरणी मुख्य आरोपींची निर्घुण हत्या

29 नोव्हेंबर

पिंपरी चिंचवडचे भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष ऍड.अंकुश लांडगे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपी गोट्या ऊर्फ सचिन धावडे आणि त्याचा मित्र अंकुश लकडे याचा आज निर्घुणपणे खून करण्यात आला. दहा ते बाराजणांनी गोळीबार करत धारदार शस्त्रानं या दोघांवर हल्ला चढवला. या घटनेत सचिन धावडे आणि त्याच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा आणखी एक मित्र संदीप मधुरे गंभीर जखमी झाला आहे. भोसरीतील धावडेवस्तीमध्ये दुपारी बाराच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे तणावाचे वातावरण पसरले आहे. 2006 मध्ये अंकुश लांडगे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सचिन धावडे हा मुख्य आरोपी होता. प्रकरणाच्या सहा वर्षांनंतर आज दोघांची हत्या करण्यात आली. हा हल्ला कोणी केला याचा तपास पोलीस करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2012 03:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close