S M L

कारवाईचा 'पंच';तिरदांजी-बॉक्सिंग संघटनांची मान्यता रद्द

07 डिसेंबरआंतराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर केलेल्या बडतर्फीच्या कारवाईनंतर भारतीय क्रीडा क्षेत्राला आज आणखी एक धक्का बसलाय. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं बॉक्सिंग आणि तिरंदाजी संघटनेवर बंदी घातली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री जितेंद्र सिंह यांनी आज ही माहिती दिली. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयओसीनं आयओएवर बंदी घातली होती. अशाच स्वरुपाची बंदी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेनं भारतीय बॉक्सिंग संघटनेवर घातली आहे. तर भारतीय तिरंदाजी संघटनेची मान्यताही रद्द करण्यात आली आहे. विजय कुमार मल्होत्रा हे भारतीय तिरंदाजी संघनेचे गेले तीन टर्म अध्यक्ष आहेत. आणि नियमानुसार 3 टर्म झालेला व्यक्ती अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकत नाहीत असं असतानाही विजय कुमार मल्होत्रा यांचा चौथा टर्म सुरु आहे. दरम्यान, या दोन्ही संघटनांना 15 दिवसांच्या आत पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2012 11:18 AM IST

कारवाईचा 'पंच';तिरदांजी-बॉक्सिंग संघटनांची मान्यता रद्द

07 डिसेंबर

आंतराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर केलेल्या बडतर्फीच्या कारवाईनंतर भारतीय क्रीडा क्षेत्राला आज आणखी एक धक्का बसलाय. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं बॉक्सिंग आणि तिरंदाजी संघटनेवर बंदी घातली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री जितेंद्र सिंह यांनी आज ही माहिती दिली. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयओसीनं आयओएवर बंदी घातली होती. अशाच स्वरुपाची बंदी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेनं भारतीय बॉक्सिंग संघटनेवर घातली आहे. तर भारतीय तिरंदाजी संघटनेची मान्यताही रद्द करण्यात आली आहे. विजय कुमार मल्होत्रा हे भारतीय तिरंदाजी संघनेचे गेले तीन टर्म अध्यक्ष आहेत. आणि नियमानुसार 3 टर्म झालेला व्यक्ती अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकत नाहीत असं असतानाही विजय कुमार मल्होत्रा यांचा चौथा टर्म सुरु आहे. दरम्यान, या दोन्ही संघटनांना 15 दिवसांच्या आत पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2012 11:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close